भाजपचे बरेच नेते आमच्या संपर्कात  

योग्य वेळेवर त्यांची नावे घोषीत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजपचे बरेच नेते आमच्या संपर्कात  

नागपूर :  तीन-चार वर्षांपासून भाजपातील काही नेते, कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. आता तेथे न्याय मिळणार नाही, अशी भिती त्यांना वाटत आहे. असेच "त्या' पक्षातील काही नेते आमच्या संपर्कात आहेत, असे भाजपचे नाव न घेता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज येथे म्हणाले. 

शिवस्वराज्य यात्रेच्या नागपूर जिल्याचा दौरा प्रारंभ करण्यापूर्वी जयंत पाटील आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी येथील दिक्षाभूमीला भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे यांनी काल जयंत पाटील यांची भेट घेतली. याबद्दल विचारले असता, माजी मंत्री रमेश बंग आणि विजय घोडमारे यांच्यासोबत चर्चा झाली. यासंदर्भात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत आघाडी एकसंघपणे काम करुन आपली ताकद दाखविणार. शिवस्वराज्य यात्रेत सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेत आहोत. पुरोगामी विचारांनीच राज्याचा पाया भक्कम होणार आहे. सोनिया गांधी कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष बनल्यानंतर शरद पवार यांची त्यांच्यासोबत पहीलीच भेट झाली. मात्र त्या भेटीचा तपशील आपल्याला मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com