प्रत्येक उमेदवार एकच मागणी करायचा, दोनपैकी एक `अमोल` द्या...

अजित पवार यांचे मताधिक्य राज्यात सर्वाधिक असल्याबद्दल जयंत पाटलांनी केले अभिनंदन
प्रत्येक उमेदवार एकच मागणी करायचा, दोनपैकी एक `अमोल` द्या...

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या विधानसभेतील उमेदवारांची प्रचारासाठी एकच मागणी असायची. ती म्हणजे दोन अमोलपैकी एका अमोलची आम्हाला सभा द्या, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे आणि वक्ते अमोल मिटकरी यांचे कौतुक केले. 

पक्षाचा विधीमंडळ नेते ठरविण्यासाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार,  प्रफुल्ल पटेल, डी. पी. त्रिपाठी, अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दिलीप वळसे पाटील, श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हे, नवाब मलिक, जितेंद्र आवाड व पक्षाचे  सर्व नवनिर्वाचित आमदार व विधान  परिषदेचे सर्व सदस्य उपस्थित होते.

पक्षाच्या निवडणुकीतील कामगिरीचा आढावा घेताना त्यांनी पक्षाने कसे काम केले, हे सांगितले. शरद पवार यांनी अविरत श्रम घेतल्याने पक्षाला मोठा प्रतिसाद मिळाला. त्याशिवाय अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी यांचे विशेष कौतुक केले पाहिजे. या दोघांच्या सभेला मोठा प्रतिसाद मिळायचा. दोघांपैकी एकाची तरी सभा द्या, अशी मागणी उमेदवार करायचे. त्यामुळे या दोघांचे येथे सत्कार करण्याची माझी इच्छा आहे. सक्षम विरोधी पक्ष काय असतो हे विधानपरिषदेत धनंजय मुंडेंनी दाखवून दिले, असे पाटील यांनी सांगितले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com