`नागपूरची मेट्रो पांढरा हत्ती; ज्यांनी उभारली तेच गडकरी दुचाकीवर`

nitin-gadkar-jayant-patil
nitin-gadkar-jayant-patil

पुणे : हजारो कोटी रुपये खर्चून उभारलेल्या नागपूर मेट्रोत फक्त दोन किंवा तीन प्रवासी प्रवास करताना दिसतात. खुद्द ज्यांनी मेट्रो उभारली ते केंद्रीय वाहतूक नितीन गडकरी या शहरातून दुचाकीवरून प्रवास करतात. या वरून लक्षात येईल की मेट्रो ही किती शहरांची गरज आहे ? मेट्रो पुढच्या काळात काही शहरात पांढरा हत्ती होण्याची शक्‍यता आहे. तोच पैसा शहराच्या पायाभूत सुविधा उभारण्यावर खर्च केला तर अधिक योग्य ठरेल, असे मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी पुण्यात व्यक्त केले.

पुण्यामध्ये मेट्रो उभारताना मेट्रो थांबे विचारपूर्वक उभारले गेले तरच नागरिकांना समाधानकारकरीतेने मेट्रोचा फायदा घेता येईल. पुण्यामधील "बीआरटी' योग्यरित्या न उभारल्याने त्याचा फायदा पुणेकरांना झाला नाही. मेट्रो अधिक चांगल्या प्रकारे उभी केल्यास पुणेकरांना आणि सरकारला त्याचा फायदा होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

देशात खुली अर्थव्यवस्था त्यातून खाजगीकरण, जागतिकरण, उदारीकरण या सुधारणा माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी माजी पंतप्रधान पी. व्ही नरसिंहराव यांच्या अधिपत्याखाली केल्या. त्यातून अर्थव्यवस्थेला झळाळी मिळण्यास सुरवात झाली. समाजकारणात, राजकारणात प्रतिनिधीत्व करणारे नेतृत्व हे मोठ्या मनाचे असणे गरजेचे आहे. तरच प्रगती जलद गतीने होते. दुर्दैवाने आत्ताच केंद्रीय नेतृत्व त्या प्रकारचे नाही. मनमोहनसिंग यांच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था दरवर्षी दोन अंकाने वाढत गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात एकुण विकासदर साडेपाच टक्‍क्‍यांच्यावर जायला तयार नाही. या घसरणीचे मुख्य कारण म्हणजे योग्य निर्णय न घेणे तसेच त्याच्या अंमलबजावणीची योग्य व्यवस्था नसणे हे असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com