जयंत पाटलांचे लक्ष्मण मानेंना निमंत्रण 

सरोजिनी चव्हाण यांनी लिहिलेल्या 'विधानसभेतील बापू' या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
जयंत पाटलांचे लक्ष्मण मानेंना निमंत्रण 

पुणे : इस्लामपूर (जि. सांगली) येथे 1 ऑगस्टला होणाऱ्या लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी शुभारंभ सोहळ्यास माजी कृषिमंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार यांच्यासोबत माजी आमदार लक्ष्मण माने यांनाही जन्मशताब्दी सोहळा समितीने निमंत्रण पाठवले आहे. 
 
राजारामबापू पाटील यांचे महाराष्ट्राच्या विकासात असलेले योगदान सर्वज्ञात आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बापूंचा वारसा समर्थपणे चालवत आहेत. बापूंवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी १ ऑगस्टला बापूंच्या जयंतीच्या दिवशी जन्मशताब्दी शुभारंभ सोहळ्याचे आयोजन केले आहे. 

या कार्यक्रमास माजी कृषिमंत्री शरद पवार, माजी राज्यपाल डी. वाय. पाटील, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार, माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अण्णासाहेब डांगें यांच्यासोबत माजी आमदार लक्ष्मण माने यांनाही निमंत्रण दिले आहे.
 
माने यांनी वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा देत महाराष्ट्र वंचित आघाडी स्थापन केली आहे. माने यांनी भाजप शिवसेना या पक्षांना फायदा होईल असं वर्तन माझ्या हातून कधीही होणार नाही असं सांगितलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्ष यांच्यासोबत आघाडी करण्याचे सुचोवाच माने यांनी केले आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पाश्ववभूमीवर हा कार्यक्रम होतोय. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com