जयंत पाटलांच्या हाती शिवसेनेचा जाहीरनामा

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस या तीनही पक्षांचीसमान कार्यक्रम निश्चित करण्यासाठी लगबग
जयंत पाटलांच्या हाती शिवसेनेचा जाहीरनामा

पुणे : शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस या तीनही पक्षांची सत्तास्थापनेसाठी आज पहिली अधिकृत एकत्रित बैठक झाली. या बैठकीत काही खास ठरले नसले तरी या तीनही पक्षांनी एकमेकांचे निवडणूक जाहीरनामे वाचल्याचे समजते. यासाठीचे समान मुद्दे तयार झाले असून नेत्यांच्या मान्यतेनंतर त्यास अंतिम स्वरूप मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

सरकार स्थापन करण्यापूर्वी या महाशिवआघाडीचा समान कार्यक्रम ठरविण्याची लगबग या नेत्यांची सुरू आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, नवाब मलिक, काॅंग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे आणि शिवसेनेकडून एकनाथ शिंदे व सुभाष देसाई यांच्यात आज चर्चा झाली. या चर्चेत अजित पवार मात्र उपस्थित नव्हते.

या समन्वय बैठकीत एकमेकांची विचारधारा समजून घेण्यासाठी जाहीरनामे वाचण्यापासून सुरवात करण्यात आली. शिवसेनेने आपले हिंदुत्व सौम्य करावे, अशी दोन्ही काॅंग्रेसची मागणी आहे. शिवसेनेने सावरकरांना भारतरत्न द्यावा किंवा समान नागरी कायदा याबाबत आग्रही भूमिका मांडण्यात येत आहे. त्यावर चर्चा झाली की नाही, हे समजू शकले नाही.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिवसेनेचा सन्मान जागावाटपात राखला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. वडेट्टीवार यांनीही चर्चेला सुरवात झाली असून मुद्दे मांडण्यात येत असून राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन करण्यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे सांगितले.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com