जयंत पाटील यांना अर्थखाते, सांगलीचा निधीचा दुष्काळ संपणार का ? 

याआधीही जयंत पाटील अर्थमंत्री असताना सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी मिळाला होता. आता गेल्या काही वर्षात रखडलेले प्रकल्प पुन्हा मार्गी लागतील आणि निधीचा दुष्काळ संपेल अशी आशा आहे.
Jayant Patil gets finance department
Jayant Patil gets finance department

इस्लामपूर  : इस्लामपूर मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आज अर्थ खात्याचे मंत्रिपद आणि त्यासह अन्य खात्यांची जबाबदारी मिळताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून त्यांना कोणते खाते मिळते याकडे इस्लामपूरसह सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतरचे अर्थ हे दुसऱ्या क्रमांकाचे खाते मिळाल्याने जयंत पाटील यांचा योग्य सन्मान झाल्याची भावना आहे.


जयंत पाटील यांच्या या निवडीने आज वाळवा तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. जयंत पाटील यांच्याकडे अर्थ, गृहनिर्माण, सहकार, कामगार कल्याण यासह अन्य काही खात्यांचा कारभार सोपविण्यात आला आहे. सलग सातव्यांदा आमदार झालेल्या आणि राज्याच्या राजकारणात सोळा वर्षे तीन खात्यांचे मंत्रिपद भूषविलेल्या आमदार जयंत पाटील यांच्याकडे महत्वाची जबाबदारी आली आहे. 


 जयंत पाटील यांना अर्थ खात्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यामागे आज राज्याची आर्थिक स्थिती विचारात घेता त्याला त्याच तोडीचा, तगडा अभ्यास असणारा मंत्री हवा हा विचार शरद पवार यांनी केला असल्याची भावना कार्यकर्त्यांची आहे. सलग 9 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम जयंतरावांच्या नावावर आहे.


राज्याच्या सत्ताकरणात जी नवी समीकरणे उदयाला आलीयत त्यात शरद पवारांच्या पाठोपाठ जयंत पाटील यांना महत्त्वाचे स्थान असल्याचे आज पुन्हा सिद्ध झाले आहे. आजचे खातेवाटप व त्यांना मिळालेली जबाबदारी हा त्याचाच भाग मनाला जात आहे.


याआधीही जयंत पाटील अर्थमंत्री असताना सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी मिळाला होता. आता गेल्या काही वर्षात रखडलेले प्रकल्प पुन्हा मार्गी लागतील आणि निधीचा दुष्काळ संपेल अशी आशा आहे. चार दिवसांपूर्वी इस्लामपूर येथील नागरी सत्कार समारंभात त्यांनी जिल्ह्याला निधी कमी पडू देणार नाही, सर्व कामे मार्गी लावू, असे जाहीर आश्वासनही त्यांनी दिले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com