सांगलीचे चार जावई मंत्री; जयंतराव डबलरोलमध्ये!

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या रुपाने जिल्ह्यातील जावयाचा राज्याच्या सर्वोच्चपदी गौरव झाला. त्यांची सासरवाडी बेडग (ता. मिरज). त्याच गावचे धनंजय मुंडे हेही जावई. तर आमदार विनय कोरे यांचे आजोळही त्याच गावात.
jayant patil
jayant patil

सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सांगलीचे तब्बल चार जावई सहभागी आहेत. जयंत पाटील हे जिल्ह्याचे सुपुत्र आणि जावई अशा डबल रोलमध्ये आहेत. बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे आणि आता शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर असे अन्य तीन जावई मंत्रिमंडळात असतील.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या रुपाने जिल्ह्यातील जावयाचा राज्याच्या सर्वोच्चपदी गौरव झाला. त्यांची सासरवाडी बेडग (ता. मिरज). त्याच गावचे धनंजय मुंडे हेही जावई. तर आमदार विनय कोरे यांचे आजोळही त्याच गावात.  

कॅबिनेट मंत्री जयंत पाटील हे म्हैसाळचे (ता. मिरज) जावई. माजी आमदार स्वर्गीय मोहनराव शिंदे हे त्यांचे सासरे. तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व कॅबिनेट मंत्रिपदावर वर्णी लागलेले बाळासाहेब थोरात हे वाळवा तालुक्‍यातील तांबवे गावचे जावई. राजारामबापू दूध संघाचे माजी अध्यक्ष नेताजीराव पाटील हे मंत्री थोरातांचे मेहुणे आहेत. जिल्ह्याच्या दोन जावयांना थेट कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांच्याशिवाय मंत्रिमंडळ विस्तारात आता आणखी दोन जावई मंत्रिपदावर आरूढ झाले आहेत. बेडग (ता. मिरज) गावच्या खाडे घराण्याचे जावई मुंडे यांना तर अपक्ष पाटील-यड्रावकर यांना शिवसेनेच्या कोट्यातून अनपेक्षितपणे राज्यमंत्रिपद मिळाले आहे. ते वसगडे (ता. मिरज) गावातील जनगोंडा पाटील यांचे जावई आहेत. त्यांच्या पत्नी स्वरुपा यांनी जयसिंगपूरचे नगराध्यपद दीर्घकाळ भूषवले आहे. यड्रावकरांचा सांगलीशी तसा जुना संबंध. त्यांच्या दोन्ही बहिणी सांगलीतील गावभागात आहेत. त्या सख्ख्या बहिणी व सख्ख्या जावा आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com