बरे झाले, अस्तनीतील निखारे गेले : जयंत पाटील

jayant_patil
jayant_patil

गुहागर  : "दोन वर्ष शरीराने आमच्यासोबत राहिलेले अस्तनीतले निखारे गेले याबद्दल त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. या निवडणुकीत फितुरांना फसवणुकीचे प्रायश्‍चित्त द्या.

स्वातंत्र्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसतो आहे. अजूनही दडपणामुळे न आलेले अनेक आहेत. त्यांना सोबत घेऊन या मतदारसंघात आपण विजयी होऊ", असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

शिवस्वराज्य यात्रेनिमित्त चिखली येथे सभा झाली.  जयंत पाटील पुढे म्हणाले, "अडचणीच्या, संघर्षाच्या काळात सोबत रहाणारा खरा मित्र असतो. ज्यांना राष्ट्रवादीत मानसन्मान मिळाला अशी अनेक मंडळी आज सोडून गेली. ती पळपुटी आहेत. या पळपुट्यांबद्दल जनतेच्या मनात प्रचंड संताप आहे. भाजप शिवसेनेच्या राजकीय स्वार्थाबद्दल चीड आहे.

आम्ही निराश झालो नाही. उलट या मेगाभरतीमुळे राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला नवे तरुण नेतृत्व मिळू लागले आहे. राज्यात पुन्हा आपली सत्ता येणार हे निश्‍चित आहे. येथे देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच आमदार होणार याची आज खात्री पटली आहे.''

दहा वर्षांत प्रदेशाध्यक्षपदासह राज्यमंत्री, मंत्रिपद मिळूनही येथील आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे गुहागरात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये निराशा आली. ती झटकून टाकण्यासाठी नियोजनात नसलेली खासदार डॉ. अमोल कोल्हेंची शिवस्वराज्य यात्रा गुहागरमध्ये आली. 

युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 30 कार्यकर्त्यांनी गौरव वेल्हाळ, वैभव आदवडे, साहिल आरेकर यांच्याबरोबर मेहनत करून हा मेळावा यशस्वी केला. अपेक्षापेक्षा अधिक कॉंग्रेसजन सभेला आल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, खासदार सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले.




 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com