Jayant Patil criticizes Devendra Fadanvis | Sarkarnama

मुख्यमंत्री किती घाबरले आहेत यावर एकत्र निवडणुकीचे ठरेल : जयंत पाटील

उमेश बांबरे
सोमवार, 17 डिसेंबर 2018

सातारा :" लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र होतील की स्वतंत्र  होतील हे  मुख्यमंत्री किती घाबरले आहेत यावर ठरणार आहे. मोदींच्या आडोशाला बसून आपण जिंकू शकतो का हे पाहूनच ते  निर्णय घेतील", अशी टीका राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

माजी खासदार लक्ष्मणराव पाटील हे आजारी असून त्यांना  पाहण्यासाठी ते आज साताऱ्यात आले होते.त्यानंतर त्यांनी जिल्हा बँकेत पत्रकारांशी संवाद साधला. 

लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्र होतील, की वेगवेगळ्या होतील या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले, "दोन्ही निवडणूका वेगवेगळ्या होतील, पण मुख्यमंत्री किती घाबरलेत, यावर सर्व अवलंबून आहे. नरेंद्र मोदी यांच्या आडोशाला बसून आपण जिंकू शकतो का याचा अंदाज घेऊन मुख्यमंत्री ठरवतील. मुख्यमंत्री किती घाबरतात यावर सर्व अवलंबून आहे. "
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख