राष्ट्रवादीची साथ सोडणारा कधीही खासदार होणार नाही : जयंत पाटील

राष्ट्रवादीची साथ सोडणारा कधीही खासदार होणार नाही : जयंत पाटील

सातारा : विधानसभेसोबत लोकसभेची पोटनिवडणुक जाहीर झालेली नाही. त्यामुळे काहींच्या पोटात गोळा उठला आहे. काहींनी निवडणुक जाहिर होण्यासाठी भाजपच्या नेत्यांचे पाय धरण्याचे काम सुरू केले आहे. पण बॅट हातात धरली म्हणून कोणी धोनी होत नाही. राष्ट्रवादीची साथ सोडणारा कधीही खासदार होणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जाहीर मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, डोळ्याचे पारणे फेडणारे स्वागत साताऱ्यात झाले. महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांनी राजकीय व्यभिचार सुरू केला आहे. त्याला अनेक जण बळी पडली आहेत. असा प्रकार यापूर्वी आपल्या राज्यात कधीच घडला नाही. लोकांना अडचणीत आणून त्यांना पक्षापुढे नतमस्तक करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ खर्च केला. प्रत्येकाची वेळ येणार आहे. तुमच्या पक्षात सक्षम लोकांची कमी असल्यानेच दुसरी पक्ष्यातील लोकांची गरज लागली आहे. मागे लोकसभा निवडणुकीवेळी मी पक्ष शिस्त न पाळणाऱ्यांना पक्षात घेऊ नका, असे मी सांगत होतो. कदाचित मी लहान होतो, माझे त्यांनी मनावर घेतले नाही. 

ते पुढे म्हणाले, भाजपप्रणीत दोन राज्यात जनादेश यात्रा भाजपने काढली होती. पण तेथे भाजपचा पराभवच झाला होता. आता महाराष्ट्रात त्याची हॅटट्रीक होणार आहे. साताऱ्यात राष्ट्रवादीला तरुणाईची ताकत मिळाली आहे. पाच वर्षात वीज, खते इंधन महागले. कॉंग्रेसच्या काळात तीन युद्ध होऊनही कधीही रिझर्व्ह बॅंकेकडील पैशाला सरकारने हात लावला नव्हता. पण मोदींनी एक लाख 76 हजार कोटी रूपये रिझर्व्ह बॅंकेतून काढले आहेत. ते कशासाठी काढले याची कारणेही त्यांना सांगता आली नाहीत. आर्थिक धोरणे चुकल्याने सध्या मंदी दारात उभी असून कंपन्या बंद पडत आहेत. भविष्यात आणखी गंभीर परिस्थिती होईल. संकटे आली की पवारसाहेब आठवतात. जिल्ह्यता पूर आला त्यावेळ मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत होते. तर शरद पवार पुरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेले होते. 80 वर्षाचा तरुण सध्या महाराष्ट्रभर फिरत आहे. ही गोष्ट मोदीपर्यंत काही तासात पोहोचल. मगच त्यांच्या लक्षात येईल की महाराष्ट्र जिंकणे सोपे नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com