jayant patil criticize chandrakant patil | Sarkarnama

पुरात वाहून आलेले चंद्रकांत पाटील दखलपात्र नाहीत!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

चंद्रकांत पाटील हे फारसे दखलपात्र नाहीत.

जळगाव: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुरात वाहून आलेले उमेदवार आहेत, असे जनताच म्हणत आहे. त्यामुळे पाटील आता दखलपात्रही नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जळगाव येथे केली.

जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्‍न विचारला असता, जयंत पाटील म्हणाले, पुण्यातील कोथरूड येथील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील हे पुरात वाहून आलेले आहेत, असे तेथील जनताच म्हणत आहेत. त्यांनी शरद पवार यांच्यावर वक्तव्य करणे अयोग्य आहे. चंद्रकांत पाटील हे फारसे दखलपात्र नाहीत.

देशाची आर्थिक अवस्था अत्यंत बिकट झाली असल्याचा आरोप करून जयंत पाटील म्हणाले, म्हणाले केंद्र सरकार आता काही रेल्वेचेही खासगीकरण करीत आहे. हे अत्यंत धोकेदायक आहे. शासनाने रेल्वेचे खासगीकरण न करता काही प्रमाणात पैसा देवून रेल्वे सुस्थितीत आणली पाहिजे. देशातील जनतेसाठी हे करणे खऱ्या अर्थाने गरजेचे आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख