मुश्रीफांना मंत्रीमंडळात महत्वाची जबाबदारी मिळणार: जयंत पाटील 

श्री. मिटकरी म्हणाले, यशवंतराव चव्हाण सांगायचे, भल्या सकाळी सहा वाजता ज्याच्या दारात चपलांचा मोठा ढिग, तोच नेता ख-या अर्थाने श्रीमंत. नेमके हेच चित्र आमदार श्री. मुश्रीफ यांच्या घरासमोर रोज बघायला मिळते. श्री. मुश्रीफ आणि जनता यांच्यातील नाळ किती घट्ट आहे ,त्याचेच द्योतक आहे.
मुश्रीफांना मंत्रीमंडळात महत्वाची जबाबदारी मिळणार: जयंत पाटील 

कागल (कोल्हापूर):  प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आमदार हसन मुश्रीफांसाठी माझी प्रचार सभा आणि त्यांचा विजय आता समीकरणच बनले, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. या निवडणुकीत मुश्रीफ सलग पाचव्यांदा विजयी होतील, असे ते पुढे म्हणाले. 

आमदार हसन मुश्रीफ यांच्या रुपाने सच्चाराम भक्ताला विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस अमोल मिटकरी यांनी याच सभेत केले.

कागलमध्ये आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आमदार श्री. पाटील व श्री. मिटकरी बोलत होते. अध्यक्षस्थानी कागलच्या नगराध्यक्षा सौ. माणिक रमेश माळी होत्या.

आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत जमणारा गोरगरिबांचा गोतावळा हीच त्यांची खरी संपत्ती आहे असे सांगत श्री. पाटील म्हणाले,"आमदार श्री. मुश्रीफ यांनी गेल्या तीस-पस्तीस वर्षात गोरगरिबांच्या कल्याणाचे समाजकारण केलं, गोरगरीब जनतेला पोटच्या पोराप्रमाणे त्यांनी छातीशी घट्ट कवटाळले, इथल्या जनतेनेही श्री. मुश्रीफ यांना आपलेच मानले, आणि मोठे केलं. कागल गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील जनतेचाही आपल्याला अभिमान वाटतो. राज्याच्या मंत्रिमंडळात श्री. मुश्रीफ यांना महत्त्वाची जबाबदारी मिळणार आहे, त्यासाठीच श्री. मुश्रीफ यांच्या ऐतिहासिक विजयाची जबाबदारी खांद्यावर घ्या.'

श्री. मुश्रीफ म्हणाले,"तुम्ही मला एवढं भरभरून दिलंय की, तुमची सेवा करण्यासाठी मी हयातभर कटिबद्ध आहे, माझ्या कातड्याचे जोडे करून जनतेच्या पायात घातले तरीही उपकार फिटणार नाहीत. गेल्या तीस पस्तीस वर्षाच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत गट, पक्ष ,पार्टी, जात-धर्म असल्या फंदात कधी पडलोच नाही. कुठल्याही मध्यस्थाशिवाय मी आणि जनता असं नातं रूढ केलं, माझ्याकडे आलेला आणि मी भेटलो नाही किंवा मी दुर्लक्ष केलं असा एक माणूस मिळणार नाही.'

यावेळी समरजीत घाटगे गटाच्या विद्यमान नगरसेविका सौ. माधवी मोरबाळे यांनी मुश्रीफ गटात प्रवेश केल्याबद्दल त्यांचा श्री. मुश्रीफ व मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी प्रताप उर्फ भैय्या माने, प्रा. मधुकर पाटील, दत्तात्रय देसाई, सागर कोंडेकर, अशोकराव सातूसे, जुनेद मुश्रीफ आदींची भाषणे झाली.  स्वागत प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर यांनी केले. आभार प्रवीण काळबर यांनी मानले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com