वंचित व एमआयएममुळे दोन्ही काँग्रेसचे 23 उमेदवार पराभूत :जयंत पाटील

..
Jayant_Patil_NCP
Jayant_Patil_NCP

इस्लामपूर :राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस,व काँग्रेस पक्षाची सत्ता आली असती. मात्र वंचित व एमआयएममुळे दोन्ही पक्षाचे 23 उमेदवार पराभूत झाले. आपल्या पक्षाचे 60 च्यावर आमदार निवडून यायला हवे होते.

मात्र पाच - सात उमेदवार अगदी कमी मतांनी हरले आहेत. सत्ता असो,अथवा नसो मात्र आपल्या मतदारसंघातील विकास कामे गतीने पूर्ण करू,असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आभारदौऱ्यात व्यक्त केला.
  आ.पाटील यांनी लवणमाची, बेरडमाची, शिरटे, कोळे, नरसिंहपूर आदी गावांचा आभार दौरा पूर्ण केला. या दौऱ्यात ते बोलत होते.

श्री. जयंत पाटील यावेळी बोलताना पुढे म्हणाले, मला राज्यात प्रचारास वेळ द्यावा लागल्याने आपल्याकडे प्रचारास फारसे येता आले नाही; मात्र आपण माझ्या प्रचाराची सर्व जबाबदारी अंगावर घेवून आपण जे कष्ट घेतले, त्यामुळे मला सातव्यांदा चांगला विजय मिळाला आहे. भविष्यात आपली अधिक चांगली सेवा करीत आपली उर्वरित विकासकामे पूर्ण करू, भाजपाचे नेते, मंत्री निवडणुकीपूर्वी 160 च्यावर आमदार निवडून येतील असे सांगत होते; मात्र त्यांचे 105 आमदार निवडून आले. राज्यातील जनतेने भाजपला नाकारले आहे. 

जयंत पाटील पुढे  म्हणाले, आपण सर्वांनी आपले मतभेद बाजूला ठेवून एकसंघपणे काम केल्यामुळे मोठा विजय मिळाला आहे. जेष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी, युवक, महिलांनी चांगले कष्ट घेतले. त्यास मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. आपण गावो-गांव केलेल्या बुथ समित्यांचे सदस्य घरो-घरो पोहचले आहेत. एखाद्याने आपल्या विरोधात मतदान केले असले,तरी त्याला भविष्यात आपल्यात सामावून घ्या. बुथ समित्या कायम कार्यरत राहून सामान्य माणसां चे प्रश्न सोडविण्यात योगदान करतील.

सभापती सचिन हुलवान,जिल्हा परिषद सदस्य पै.धनाजी बिरमुळे, माजी जि.प.सदस्य प्रकाश पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,संजय पाटील, सुनील पोळ,पं.स.सदस्या विजया पोळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. गावोगावच्या कार्यकर्ते,व मतदारांनी त्यांचे जोरदार स्वागत करीत त्यांचा अभिनंदन सत्कार केला. जागो-जागी माता- भगिनींनी त्यांचे औक्षण केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com