राज ठाकरे पोपट आहेत की गरुड हो थोड्याच दिवसांत कळेल : जयंत पाटील

मुख्यमंत्र्यांचे पोपट महाराष्ट्रात किती आहेत व किती जण मुख्यमंत्र्यांची स्क्रीप्ट वाचतात याची आमच्याकडे यादीच आहे. ती आम्ही वेळ आल्या वर सांगू असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पाठराखण केली.
राज ठाकरे पोपट आहेत की गरुड हो थोड्याच दिवसांत कळेल : जयंत पाटील

मुंबई : मुख्यमंत्र्यांचे पोपट महाराष्ट्रात किती आहेत व किती जण मुख्यमंत्र्यांची स्क्रीप्ट वाचतात याची आमच्याकडे यादीच आहे. ती आम्ही वेळ आल्या वर सांगू असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पाठराखण केली. आजकाल पोपटाला बारामतीतून स्क्रीप्ट मिळते व पोपट बडबड करतो, अशी टीका आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भाजपच्या महिला मेळाव्यासमोर बोलताना केली होती. त्याला जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे.

जयंत पाटील म्हणाले, "राज ठाकरे स्वयंभू आहेत. त्यांना कोणाच्या स्क्रीप्टची गरज नाही. राज ठाकरे जे बोलले ते भाजप आणि मंत्र्यांना चांगलेच झोंबलेले आणि वर्मी लागल्याचे दिसते आहे. राज ठाकरे पोपट आहेत की गरुड ते काही दिवसात कळेल. राज ठाकरे जे बोलतात त्यातून महाराष्ट्राच्या जनतेला उकल होऊ लागली आहे. चुकीचा आणि अपप्रचार करण्याची मुख्यमंत्र्यांची सवय पाच वर्षात गेली असेल असं वाटलं होते, पण तसे दिसत नाही,"

" राज यांचा पक्ष काही गोष्टी स्पष्टपणे मांडतो आहे. मोदी कसे फसवतात याबद्दल एकमत असणारा जो एक समुह आहे, त्या समुहाप्रमाणेच राज यांची भूमिका दिसते आहे. पंतप्रधान मोदींच्या खोटारडेपणावर बोलणारे राज ठाकरे एक आहेत, आम्ही सर्वांनी एकत्र यावे, असे आम्हाला वाटते. राज ठाकरे राष्ट्रवादीच्या मंचावर दिसतील की नाही हे लगेच मला सांगता येणार नाही. पण आमची तशी भूमिका आहे. काँग्रेसने मात्र अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही," असेही पाटील म्हणाले. आमच्या मतांमध्ये फूट पाडण्याचा मुख्यमंत्र्यांचा आणि भाजपचा जो प्रयत्न आहे, तो पुढच्या काळात आम्ही उघड करु, असेही पाटील यांनी सांगितले.

राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीच्या वाट्यातील जागा दिलेली आहे. काँग्रेसकडून जागा देणे बाकी आहे. काँग्रेस दोन दिवसांमध्ये निर्णय घेऊन यावर तोडगा काढेल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.  हितेंद्र ठाकूर यांनी काल भेट घेतली असून त्यांना पाठिंबा द्यायचा की की आणखी काही, याबद्दल दोन दिवसांत निर्णय होईल, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com