मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी शिवेंद्रबाबा भाजपात गेले!

आपल्यासोबत शरद पवार हे विद्यापीठ आहे.
jayant patil attack on shivendraraje
jayant patil attack on shivendraraje

सातारा : ज्यांच्यात लढण्याची ताकद, मानसिकता नाही, त्यांनी पक्ष बदलावा. मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी बाबा (शिवेंद्रसिंहराजे भोसले) भाजपवासी झाले आहेत. अभयसिंहराजेंपाठोपाठ शिवेंद्रसिंहराजेंनाही पक्षाने आपुलकीची वागणूक दिली. पण, त्यांना कोणता काटा टोचला, असा सवाल करत जे गेले त्यांना श्रद्धांजली, पण जे वाटेवार आहेत, त्यांना पक्षाबरोबर राहण्याची सुबुद्धी लाभो. तरीही गेलेच तर त्यांना आगामी निवडणूक जाचेल, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज रात्री साताऱ्यात आली. येथील कल्याण रिसॉर्टमध्ये झालेल्या सभेला खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार शशिकांत शिंदे अमोल मिटकरी, रूपाली चाकणकर,  मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने आदी उपस्थित होते. 

"पक्षावर संकटे असताना काही जण निष्ठेने राहिले, पण काही जण पळून गेले. त्यांची इतिहासात नोंद होईल. राष्ट्रवादीच्या स्थापनेपूर्वी शरद पवार यांनी अभयसिंहराजे भोसले यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनी श्री. पवार यांना साथ दिली. वडिलांप्रमाणे शिवेंद्रसिंहराजेंनाही पक्षाने आपुलकीची वागणूक दिली. पण, तुम्हाला कोणता काटा टोचला? मर्द मावळा असल्याप्रमाणे काही तरी दाखवा. माझ्याकडे चार कारखाने आहेत. माझ्या कारखान्याचे सात बारा बदलले, तरी मी मागे हटलो नाही. संकट आले तर तुम्ही पळून गेला, असा तुमचा बाणा कोणता? अशी टोकदार टीका श्री. पाटील यांनी शिवेंद्रसिंहराजेंचे नाव न घेता केली. 

श्री. पाटील म्हणाले, "शरद पवार 80 वर्षांचे वय असतानाही पूरग्रस्त भागात फिरले. केवळ जनतेशी बांधिलकी असल्याने ते फिरत आहेत. शरद पवार यांच्यासारखा नेता पुन्हा होणार नाही. तुमचा आमचा स्वाभिमान पवार आहेत. आज अ, उद्या ब, क, ड गेला पण आम्हाला काही फरक पडणार नाही. आपल्यासोबत शरद पवार हे विद्यापीठ आहे. नवीन पिढी, नवीन चेहरे हे सूत्र श्री. पवार यांनी आणले असून, पुन्हा एकदा तरुण रक्‍ताला पुढे आणले जाणार आहे. यासाठी तरुणांचे नेतृत्व करण्यासाठी अमोल कोल्हे यांना पुढे आणले आहे.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com