jayant patil attack modi government | Sarkarnama

पाच राज्यातील भाजपचा पराभव हा पंतप्रधान मोदींच्या अपयशाचा परिणाम : जयंत पाटील 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 17 डिसेंबर 2018

सातारा : साताऱ्यात भाजप दहा हजार कोटींची कामे करत असल्याची केवळ मोठ मोठ्या घोषणा करून मोठे आकडे दाखविणे हीच त्यांची निती आहे. हे घोषणा बाज सरकार आहे. पाच राज्यातील पराभव हा स्थानिक नेतृत्वाचा पराभव असल्याचे भाजप म्हणेल. पण हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अपयशाचा परिणाम आहे. अशी टिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ाज साताऱ्यात केली. 
े 

सातारा : साताऱ्यात भाजप दहा हजार कोटींची कामे करत असल्याची केवळ मोठ मोठ्या घोषणा करून मोठे आकडे दाखविणे हीच त्यांची निती आहे. हे घोषणा बाज सरकार आहे. पाच राज्यातील पराभव हा स्थानिक नेतृत्वाचा पराभव असल्याचे भाजप म्हणेल. पण हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अपयशाचा परिणाम आहे. अशी टिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ाज साताऱ्यात केली. 
े 
जिल्हा बॅंकेत ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपने साताऱ्यातील रस्त्यांसाठी दहा हजार कोटींचे पॅकेज दिले आहे, याबाबत विचारले असता जयंत पाटील म्हणाले, की खंडाळा व साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीत आलेले उद्योग ही आमच्या काळातील गुंतवणूक आहे. बेरोजगार युवकांना केंद्र व राज्य सरकारने आश्‍वासने दिली ती पूर्ण करू न शकल्याने सरकार अपयशी ठरले आहे. महागाई वाढली असून इंधनाचे दर वाढले आहेत. पेट्रोल, डिझेलच्या किंमती आवाक्‍यात ठेवण्याचा या सरकारचा दृष्टीकोन दिसत नाही. रॉकेल कमी करून ग्रामीण जनतेला सरकार छळत आहे. रॉकेल कमी आणि गॅसचे दर वाढविले असून यातून सरकार पैसे कमवत आहे. 

द्वेष करून मते मिळत नाहीत 
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने जिल्ह्यावर सरकारकडून अन्याय होतोय का, यावर ते म्हणाले, राष्ट्रवादीला पाठींबा मिळत असल्याने भाजपकडून जिल्ह्याचा व्देष केला जात आहे. एखाद्या भागाचा व्देष करून मते मिळत नाहीत. येथे प्रकल्पांची घोषणा होते पण पैसे येत नाहीत, असे ही त्यांनी स्पष्ट केले. 

मोदींच्या अपयशाचा परिणाम.. 
पाच राज्यातील निकालावरून महाराष्ट्रातही हिच परिस्थिती राहिल असे वाटते का, या प्रश्‍नावर ते म्हणाले, पाच राज्यातील पराभव हा स्थानिक नेतृत्वाचा पराभव असल्याचे भाजप म्हणेल. पण हा मोदींच्या अपयशाचा परिणाम आहे. मोदी व देवेंद्र फडणवीस सरकारचे अपयश असे दोन्ही एकत्र करून भाजपला महाराष्ट्रात यापुढे प्रतिकूल परिस्थिती निर्माण होईल. दुष्काळी प्रश्‍नावर सरकारचे दूर्लक्ष असून दोन चार जीआर काढण्यापेक्षा पुढे सरकार जात नाही. 

कॉंग्रेसकडून राष्ट्रवादीवर दबाव तंत्र वापरले जाण्याची शक्‍यता वाटते का, यावर जयंत पाटील म्हणाले, केवळ निवडणुक जिंकण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत. येथे मागण्याचा आणि देण्याचा प्रश्‍न नाही. मतदारसंघात कोणाला अनुकूल परिस्थिती जास्त आहे, त्याचा अंदाज घेऊन जागा वाटप करू. सर्व अंदाज घेऊनच जागा वाटप होईल. त्यादृष्टीने चर्चा झालेली आहे. त्यामुळे एकमेकावर प्रेशर टाकण्याचा प्रश्‍नच येत नाही. 

तर आम्ही आंबेडकरांच्या बोलण्याकडे दूर्लक्ष करू... 
जातीयवादी शिवसेना भाजपच्या युतीला ज्यांचा विरोध आहे, त्या सर्वांना संघटित करण्याचा आमचे नेते शरद पवार व आमचा प्रयत्न आहे. प्रकाश आंबेडकरांची भुमिका तीच आहे आणि असावी. कॉंग्रेसचे नेते सध्या प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करत आहेत. मी आणि अशोक चव्हाण येत्या दोन दिवसांत आंबेडकरांना भेटणार आहोत. भाजप-शिवसेनेला विरोध करणारे आणि ज्यांचा धर्मनिरपेक्ष विचारांवर विश्‍वास आहे, त्या सर्वांनी एकत्र आले पाहिजे. त्यासाठी आम्ही आंबेडकर आजपर्यंत शरद पवार आणि राष्ट्रवादीबाबत काय बोलले, याकडे दूर्लक्ष करून त्यांच्यासोबत चर्चा करण्यास तयार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख