वाढदिवसानिमित्त गोरगरीबांना शिवभोजन थाळी देणाऱ्या सईचे जयंतरावांकडून कौतुक - Jayant Patil Applauded Islampur Girl for Providing ShivBhojan on Birthday to Needy | Politics Marathi News - Sarkarnama

वाढदिवसानिमित्त गोरगरीबांना शिवभोजन थाळी देणाऱ्या सईचे जयंतरावांकडून कौतुक

संपत मोरे
रविवार, 12 एप्रिल 2020

सई मोहिते या विद्यार्थीनीने वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत पाच दिवस चारशे जणांना मोफत शिवभोजन थाळी उपलब्ध करून देणार आहे. येत्या पाच दिवसात इस्लामपुरातील गरीब, गरजूंना शिवभोजन केंद्रावर सईच्या वाढदिवसानिमित्त मोफत  जेवण मिळेल

पुणे :  इस्लामपूर येथील चौदा वर्षाची शालेय विद्यार्थीनी सई विनोद मोहिते हिने वाढदिवसाचा खर्च टाळत, त्याऐवजी ४०० जणांना मोफत शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली आहे. सईच्या वाढदिवसानिमित्त येत्या पाच दिवसात गरीब, गरजूंना शिवभोजन केंद्रावर मोफत जेवण मिळणार आहे. लॉकडाऊनच्या काळात सामाजिक भान जपत गोरगरिबांच्या मदतीला धावून आलेल्या सईला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कौतुक केले आहे.
 
सई मोहिते या विद्यार्थीनीने वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत पाच दिवस चारशे जणांना मोफत शिवभोजन थाळी उपलब्ध करून देणार आहे. येत्या पाच दिवसात इस्लामपुरातील गरीब, गरजूंना शिवभोजन केंद्रावर सईच्या वाढदिवसानिमित्त मोफत  जेवण मिळेल. 

या उपक्रमाबाबत तिचे वडील विनोद मोहिते यांनी म्हणाले," वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा खर्च टाळून तो गरजूंसाठी करावा असे वाटत होते. हातांवर पोट असणाऱ्या, भीक मागून खाणाऱ्या, भटकंती करणाऱ्या लोकांकडे अवघे पाच रुपयेही नसतात. लॉकडाउनच्या काळातील या बातम्या ऐकून सईने तिच्या वर्षातील जमा झालेल्या पॉकेटमनीतून शिवभोजन योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांना जेवण देण्याचे ठरवले."

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक डाऊन आहे. अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. हातावर पोट असणाऱ्या लोकांची मिळकत बंद झाली आहे. पर्यायाने जेवणाचे प्रचंड हाल होत आहेत. काही सामाजिक कार्यकर्ते,स्वयंसेवी संस्था किराणा माल उपलब्ध करुन देत आहेत. पण ज्यांना घर नाही. जे फुटपाथवर राहतात त्यांना अन्न शिजवावे कसे हा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत शिवभोजन थाळीचे महत्व वाढले आहे. मोहिते कुटुंबातील सई हिने 400 लोकांना थाळी देऊन तिचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा केला.

हे देखिल वाचा - जितेंद्र आव्हाड यांचे आता जयंत पाटलांच्या पावलावर पाऊल!

पुणे : राज्यात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असताना राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी राबवलेला इस्लामपूर पॅटर्न  मार्गदर्शक ठरत आहे, असे सांगत गृहनिर्माण मंत्री आजच जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या पावलावर पाऊल टाकायचे ठरविले आहे. पाटील यांच्याकडून मी नेहमीच शिकत आलो आहे. आजच्या या कठीण काळात त्यांनी जो "इस्लामपुर पॅटर्न" या कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी इस्लामपुरात वापरला,तोच पॅटर्न मी आता माझ्या कळवा मुंब्रा भागामध्ये राबवतो आहे. हा पॅटर्न अतिशय परिणामकारक आहे. मला आशा आहे की याचे चांगले परिणाम मला माझ्या कळवा मुंब्रा मध्ये लवकरच पाहायला मिळतील, असा विश्वास व्यक्त करत इस्लामपूर पॅटर्नच कळवा-मुंब्राला करोनापासून वाचवेल, असा दावा आव्हाड यांनी केला.......

सविस्तर बातमी येथे वाचा

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख