जुन्नरच्या नाकर्त्या आमदाराला विधानसभेऐवजी घरी पाठवा : जयंत पाटील

जुन्नरच्या नाकर्त्या आमदाराला विधानसभेऐवजी घरी पाठवा : जयंत पाटील

आळेफाटा : जुन्नरसाठी पाच आवर्तनाची तीन आवर्तने करणाऱ्या नाकर्त्या आमदाराला  विधानसभे ऐवजी घरी पाठवा" असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी राजुरी (ता. जुन्नर)  येथे केले. अतुल बेनके यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलताना केले.  

ते पुढे म्हणाले, " पिंपळगावजोगा पाणी व्यवस्थापनात विद्यमान लोकप्रतिनिधीच्या काळात पाच आवर्तनाची तीन आवर्तने झाली, आता जर का ते पुन्हा निवडून आले तर तीनाचे एकच आवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही " 
लोकप्रतिनिधीनी पिंपळगावजोगा कालव्याच्या पाण्याची पाचाची तीन आवर्तने केली हा त्यांचा प्रताप आहे असेही ते म्हणाले आणि आता पुन्हा निवडून दिले तर तीनाचे एकच होईल तेव्हा मतदारांनी सावध राहण्याचे आवाहन पाटील यांनी केले.

आपल्या भागाला वरदान ठरणारा कुकडी प्रकल्प माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या  काळात ताकदीने पूर्ण करण्यात आला यामुळे हा प्रकल्प आपल्या भागाला मोठे वरदान ठरला आहे. या भागाचे दैन्य दूर करण्याचे काम या प्रकल्पामुळे झाले आहे. अतुल बेनके यांचे व्हिजन पाहिले तर आमदार झाल्यावर मोठे काम हा युवानेता उभे करीन यावर आमचा विश्वास आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com