..तर मग भाजपाचे हिंदुत्व पुसले गेले नाही का ? - जयंत पाटील

पाटील म्हणाले, "" गडकरी यांच्या व्याख्येनुसार आमच्याबरोबर आल्याने शिवसेनेचे हिंदुत्व पुसले असेल आणि त्यामुळे ते यापुढे हिंदुत्वाचा पुरस्कार करू शकणार नसतील तर भाजपही यापुढे हिंदुत्वाचा पुरस्कार करू शकणार नाही. हिंदुत्ववादी मतांवर डोळा ठेऊन गडकरी यांनी वरील विधान केले आहे. शिवसेना आमच्याबरोबर आल्याने हिंदुत्ववादी मते मिळविण्यासाठी ही दिशाभूल केली जात आहे. शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका आमच्या दोन्ही पक्षांना माहीत आहे. या देशात राहणारा प्रत्येक माणूस देशावर प्रेम करणारा असावा, ही शिवसेनेची भूमिका असून त्यात काही वावगे आहे, असे मला वाटत नाही. ''
 ..तर मग भाजपाचे हिंदुत्व पुसले गेले नाही का ? - जयंत पाटील

पुणे : कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर गेल्याने शिवसेनेचे अस्तित्व पुसले गेले असेल तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत मंत्रिमंडळ स्थापन केल्यानंतर भारतीय जनता पार्टीचेदेखील हिंदुत्व पुसले गेले आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री जयंत पाटील यांनी आज केली. 

गडकरी यांनी शिवसेनेवर मध्यंतरी जोरदार टीका केली होती. "साम टीव्ही'ला दिलेल्या एका मुलाखतीत पाटील यांनी गडकरी यांच्या आरोपांना चोख उत्तर दिले आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीबरोबर गेल्याने शिवसेनेचे हिंदुत्व पुसले गेल्याची टीका केंद्रींय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. त्यावर जयंत पाटील यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे. पाटील म्हणाले, "" गडकरी यांच्या व्याख्येनुसार आमच्याबरोबर आल्याने शिवसेनेचे हिंदुत्व पुसले असेल आणि त्यामुळे ते यापुढे हिंदुत्वाचा पुरस्कार करू शकणार नसतील तर भाजपही यापुढे हिंदुत्वाचा पुरस्कार करू शकणार नाही. हिंदुत्ववादी मतांवर डोळा ठेऊन गडकरी यांनी वरील विधान केले आहे. शिवसेना आमच्याबरोबर आल्याने हिंदुत्ववादी मते मिळविण्यासाठी ही दिशाभूल केली जात आहे. शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका आमच्या दोन्ही पक्षांना माहीत आहे. या देशात राहणारा प्रत्येक माणूस देशावर प्रेम करणारा असावा, ही शिवसेनेची भूमिका असून त्यात काही वावगे आहे, असे मला वाटत नाही. '' 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com