शेकाप, स्वाभिमानीचेही सरकार स्थापनेत मोठे योगदान : जयंत पाटील  

राज्याच्या सत्तेत आम्हाला बसवण्यात शिवसेनेसह शेकाप, स्वाभिमानीसह अन्य छोट्या पक्षांचा मोठा वाटा आहे.
Jayant Patil felicitated
Jayant Patil felicitated

सांगली : जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील शेतीला पाणी देण्यासाठी दुसरी म्हैसाळ योजना करु. यापूर्वी ज्या भागात शेतीसाठी पाणी दिले. दुष्काळी भागांना नियमीत पाणी देण्याला प्राधान्य देऊ. सामान्य लोकांची कामे तातडीने होण्यासाठी, त्यांचे शासकीय कार्यालयातील हेलपाटे वाचवण्यास प्रशासकीय यंत्रणा कार्यक्षम करू, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज येथे केले. मी केवळ राष्ट्रवादीचा नव्हे तर सामान्यांचा पालकमंत्री आहे, याची जाणीव राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठेवावी, असेही ते म्हणाले.

येथील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या पटांगणावर पालकमंत्री श्री. पाटील यांचा स्वातंत्र्य सैनिक, शेतकरी, माजी सैनिक, वारकरी, कष्टकऱ्यांच्या हस्ते नागरिक सत्कार करण्यात आला. मंत्री पालकमंत्री पाटील बोलत होते. 


कॅप्टन गणपतराव सुर्यवंशी, शेतकरी भुजंगा पाटील, स्वातंत्र्य सैनिक जयराम कुष्टे, कष्टकरी धोंडिराम माने, वारकरी एकनाथ कदम यांनी पालकमंत्री पाटील यांच्या सत्काराचा मान देण्यात आला. मंत्री श्री. पाटील पालकमंत्री झाल्यानंतर आज प्रथमच सांगलीत आले होते. त्यांचे सर्वपक्षीय चाहते, कॉंग्रेस, शिवसेनेसह विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक, कला, क्रीडा, आरोग्य, साहित्य तसेच उद्योजक, व्यापारी, कामगार संघटना, वैद्यकीय क्षेत्रातील संस्थांसह नागरिकांनी मंत्री पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांचा सत्कार केला. विविध मागण्यांची निवेदनेही देण्यात आली. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. संघटनांनी सत्कार करतानाच समस्यांबाबत चर्चाही केली.


मंत्री श्री. पाटील म्हणाले,"सांगली शहराच्या विकासाच्या अनेक कल्पना आहेत. त्यातील काही विकासकामे यापूर्वीच केलीत. शहरातील गल्ली-बोळ अन्‌ सर्व झोपडपट्ट्या माहिती आहेत. त्यामुळे फारसी अडचण नाही. श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी अपेक्षा व्यक्त केल्याप्रमाणे दुष्काळी भागातील लोकांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ, टेंभू, वाकुर्डे योजनांना गती देऊ. ज्या भागाला पाणी मिळाले नाही त्यांच्यासाठी नव्याने निधी देवून पण म्हैसाळ योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या भागासाठी आणखी एक म्हैसाळ योजना राबवू. मात्र ज्या भागाला पाणी दिले. शेतकरी अनियमित पाण्यामुळे असमाधानी आहेत. त्यांना नियमित पाणी देण्यासाठी विशेष प्रयत्न केला जाईल.''


श्री. पाटील म्हणाले,"सरकारने तातडीने शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंतची कर्जमाफी केली. विदर्भ, खाणदेश, कोकण, मराठवाड्यासह ऊस, द्राक्ष, केळीचे छोटे उत्पादक 75 टक्के शेतकरी यामुळे कर्जमुक्त झालेत. राज्याच्या सत्तेत आम्हाला बसवण्यात शिवसेनेसह शेकाप, स्वाभिमानीसह अन्य छोट्या पक्षांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्याही मागण्यांचा समान कार्यक्रमात समावेश केला आहे. त्यांची ताकद किती यापेक्षा त्यांच्या भावना महत्वाच्या आहेत. विकासाचा ध्यास महत्वाचा आहे.''


राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, श्रीमती जयश्री पाटील, विशाल पाटील, किशोर जामदार, सतिश साखळकर, शेकापचे अजित सुर्यवंशी, शंकर पुजारी, रावसाहेब खोचगे, महेश खराडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय बजाज, शहर जिल्हाध्यक्ष राहूल पवार, सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील, सुरेश पाटील, भालचंद्र पाटील, राजाभाऊ पद्माळकर, मैनुद्दीन बागवान, फिरोज पठाण, शेडजी मोहिते, सागर घोडके, विष्णू माने, हरिदास पाटील, फिरोज पठाण, बाळासाहेब गोंधळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com