jayant patil about udyanraje | Sarkarnama

म्हणून उदयनराजे आले नसतील : जयंत पाटील 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज साताऱ्यात राष्ट्रवादीची बैठक घेतली. या बैठकीला खासदार उदयनराजे उपस्थित नव्हते. 

सातारा : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज साताऱ्यात राष्ट्रवादीची बैठक घेतली. या बैठकीला खासदार उदयनराजे उपस्थित नव्हते. 

पत्रकारांनी याकडे लक्ष वेधले असता पाटील म्हणाले, हा बुथ लेवलचा कार्यक्रम आहे. त्यामुळे ते आले नसतील. खासदारकीविषयी आमची आज काहीही चर्चा झालेली नाही. तरीही ते आमच्या पक्षाचे खासदार आहेत. त्यांचे सातारा मतदारसंघात काम आहे. तसेच या मतदारसंघात असलेले आमदारही पक्षाचे निष्ठावंत आहे. पक्षाचे जिल्ह्यातील सर्व आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी बोलूनच खासदारकीच्या उमेदवारीबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख