jayant patil about sadashivrao patil... | Sarkarnama

सदाशिवराव आधी राष्ट्रवादीत आले असते तर...

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

..

सांगली : माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे अनेक समीकरणे बदलली असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत सांगलीत त्याचे परिणाम दिसण्याची शक्यता आहे. त्यावरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली.

 जयंत पाटील म्हणाले,""सदाभाऊंच्या प्रवेशासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवरही प्रवेश झाला असता तर चित्र वेगळे दिसले असते. तरीही त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. विटा नगरपालिका, जि. प., पं. स. सह सन 2024 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस राज्यात मोठा पक्ष असेल.''

सदाशिवराव पाटील म्हणाले,""निवडणुकीपूर्वी पवारसाहेबांशी दोनदा चर्चा झाली. लोकांच्या भूमिकेमुळे अपक्ष लढलो. निवडणुकीत ज्यांनी मदतीचा शब्द दिला त्यांनी पाठ फिरवली. त्यानंतर मी राष्ट्रवादीत जाण्याची तयारी केली. प्रदेशाध्यक्ष श्री. पाटील यांच्याशी चर्चा झाली. त्यावेळी सत्ता येण्याची शक्‍यता नव्हती. सत्ता नसती तरीही राष्ट्रवादीत प्रवेश करणार होतोच. सन 1980 मध्ये पवारसाहेबांना वडिलांनी साथ दिली. यापुढे तुमच्याबरोबर कायम राहू. राष्ट्रवादीकडून काही मागणार नाही. सन्मानाची वागणूक आणि कामाची अपेक्षा आहे.''

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ऍड. बाबासाहेब मुळीक, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांची भाषणे झाली. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, कमलाकर पाटील, राहुल पवार, दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने, सुशांत देवकर, उपनगराध्यक्ष संजय तारळेकर, किरण तारळेकर, मनीषा शितोळे, मीनाक्षी पाटील, प्रतिभा चोथे, पं. स. सदस्य संजय मोहिते, आटपाडीचे तुषार पवार, प्रभाकर नांगरे-पाटील, विसापूरचे चंदूनाना पाटील, लेंगरेचे श्रीरंग शिंदे, माधळमुठीचे सरपंच सिद्धेश्वर धावड, संपत मोरे, अविनाश चोथे, प्रताप सुतार आदी उपस्थित होते.

विटापालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक, विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, माजी सरपंच, विकास सेवा सोसायट्यांचे अध्यक्ष, संचालक, लोकप्रतिनिधींनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. सोहळ्यासाठी मतदार संघातून मोठी गर्दी झाली होती. संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संकुलच्या आवारात गर्दी झाली होती.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख