`फडणवीस पुन्हा येईल म्हणाले होते...पण विरोधी पक्षनेता म्हणून`

..
jayant patil about devendra fadanavis
jayant patil about devendra fadanavis

मुंबई : देवेंद्र फडणवीस हे `मी पुन्हा येईन, असे म्हणाले होते. मात्र ते मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर विरोधी पक्षनेता म्हणून परत विधानसभेत येईन, असा टोला मंत्री जयंत पाटील यांनी आज लगावला. त्यांच्या या वाक्यावर विधानसभेत एकच हशा पिकला.

देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेते म्हणून विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांची निवड जाहीर केली. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

जयंत पाटील यांनी त्यांच्या अभ्यासू वृत्तीचे कौतुक केले. अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे आमदार असताना त्यावेळी माझ्या घरी आले होते. त्यांनी ते दोन ते तीन तास ते समजून घेतले.  त्यावर त्यांनी पुस्तक लिहिलं. कष्टाची परिसीमा करून  ते विषयाचा पाठपुरावा करतात. सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून ते काम करतील. सभागृहातील जागांची अदलाबदल करण्यासाठी ते पुढील पाच वर्षांत प्रयत्न करणार नाहीत, अशीही अपेक्षा व्यक्त करतो. 

बाळासाहेब थोरात म्हणाले की फडणवीस यांची जडणघडण ही विरोधी पक्षनेता म्हणून झाली आहे. ते गेली  पाच वर्षे सत्तेत होते. मात्र तुमचा आवाज विरोधी पक्षासारखा होता. आम्ही विरोधात असताना आवाज आमचा सरकारसारखा होता. याचे कारण आम्ही संस्था चालविणारे आहोत. सर्वांना बरोबर घेऊन आम्ही काम करतो. त्यामुळे एकतर्फी कारभाराची सवय आम्हाला नाही. फडणवीस यांच्याकडे कोणी आमदार काम घेऊन गेला की तो हसत बाहेर पडायचा.

फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून अतिशय सक्षमपणे काम केल्याची भावना मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री बनतील यासाठी अंबाबाईला प्रार्थना करतो, अशा शुभेच्छा दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com