jayant patil about bjp performance in 2019 | Sarkarnama

भाजप आमदारांची संख्या 60 पर्यंत खाली येणार : जयंत पाटील 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

देशातील लहान सहान समाजाला गेल्या 60 वर्षात आघाडी सरकारने संरक्षण दिले होते. ते मोडून काढण्याची मानसिकता भाजपची असून भारतीय जनता पक्ष या देशात पुन्हा एकदा मनुवाद आणण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. 

सातारा : देशातील लहान सहान समाजाला गेल्या 60 वर्षात आघाडी सरकारने संरक्षण दिले होते. ते मोडून काढण्याची मानसिकता भाजपची असून भारतीय जनता पक्ष या देशात पुन्हा एकदा मनुवाद आणण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. 

दरम्यान, शहरी मतदारांना फसविल्याने 122 आमदारांवरून भाजप ताकत आगामी निवडणुकीत 60 ते 70 आमदारावर येऊ शकते, असे भाकित त्यांनी केले. 

सांगलीकडे जाताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनात आले होते. यावेळी त्यांनी बुथ स्तरावरील बांधणीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

ते म्हणाले, मोदीच्या खोट्या आश्‍वासनावर शहरी मतदारांचे मन वळविण्यात भाजप यशस्वी झाले होते. तोच मतदार आता त्यांच्यापासून दूर गेल्याचे दिसते. एखाद्या महापलिकेतील यशामुळे सर्व चित्र बदलेले असे होत नाही. विधानसभा व लोकसभेचे निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा वारंवार आमचे ऐवढेच आमदार येणार तेवढे येणार हे सांगत आहेत. मुळात त्यांचेच सरकार केंद्रात व राज्यात असताना त्यांनी हे सांगायची गरज नाही. मुळात वातावरण त्यांच्या विरोधात गेले आहे. त्यांची महाराष्ट्रातील ताकद 50 ते 60 आमदारांचीच राहिली आहे. त्यामुळे 122 आमदार असलेल्या भाजपची ताकत आगामी निवडणुकीत 60 ते 70 आमदारावर येऊ शकते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख