`अजितदादा रात्री माझ्याशी बोलले....पण हे सांगितलेच नाही`

अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीचे नेतेही चकीत
jayant patil about ajit pawar mutiny
jayant patil about ajit pawar mutiny

सातारा : माझे शुक्रवारी रात्री उशिरा आणि अजित पवार यांच्याशी बोलणे झाले होते. पण भाजपसोबत जाण्याबाबत कसलीच चर्चा झाली नाही. आजच्या या प्रकाराबाबत मला कोणतीही कल्पना नव्हती, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले.

जयंत पाटील म्हणाले, अजित पवार यांच्याशी माझी रात्री उशीरा बोलणे झाले होते, त्यामध्ये शिवसेना, काँग्रेस सोबतची चर्चा लवकर मिटली पाहिजे, फार वेळ लागला असे त्यांचे मत होते, पण ते भाजप सोबत जातील याची  मला कोणतीच कल्पना नव्हती. आता मी पवारसाहेब यांची भेट घेण्यासाठी निघालो आहे, त्यामुळे प्रसार माध्यमांनी  अधीर होऊ नका.पवार साहेब त्यांच्याशी चर्चा करून मी सर्व माहिती घेऊन सांगतो.

दुसरीकडे भाजप सोबत सत्तेत जाण्याचा अजित पवार यांची भूमिका ही त्यांची वैयक्तिक असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी त्याचा काही संबंध नाही. राष्ट्रवादीचा त्याला पाठिंबा नाही, असे मत खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

भाजपने व राष्ट्रवादी सोबतसरकार स्थापन केल्यानंतर शरद पवार यांची काय भूमिका राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र त्यांनी ट्वीट करून राष्ट्रवादीचा अजित पवार यांच्या भूमिकेला पाठिंबा नाही. सत्तेत जाण्याचा अजित पवार यांची भूमिका ही त्यांची वैयक्तिक असून राष्ट्रवादीशी संबंध नाही, असे म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com