नाशिकच्या पाण्यावर जायकवाडी धरण यंदा भरणार का?

जायकवाडी धरणात सध्या 2 लाख 20 हजार 500 क्‍यूसेस पाण्याची आवक सुरू आहे.
jaikwadi
jaikwadi

नाथनगर उत्तर   : नाशिक आणि नगर जिल्ह्यातून वेगाने येणाऱ्या पाण्यामुळे जायकवाडी धरण आठ दिवसात 45 टक्के भरले आहे. पाण्याचा ओघ असाच कायम राहिला तर रात्रीतून जायकवाडी धरण 50 टक्के भरण्याची शक्‍यता आहे.

जायकवाडी धरणात सध्या 2 लाख 20 हजार 500 क्‍यूसेस पाण्याची आवक सुरू आहे. नांदूर - मधमेश्‍वर, दारणा, भंडारदरा अशी जायकवाडीच्या वर असणारी लहान-मोठी सर्व धरणे भरलेली आहेत. जायकवाडी धरणात सध्या 1696.346 दशलक्ष घनमीटर जलसाठा असून त्यापैकी 958.240 दशलक्ष घनमीटर जलसाठा प्रवाही सिंचनासाठी उपयुक्त मानला जातो.

ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीलाच धरण 50 टक्‍क्‍यांपर्यंत भरत आल्याने यंदा हे धरण भरले जाण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. जायकवाडी धरण औरंगाबादपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या पैठण शहराजवळ आहे. यंदा पैठण, गंगापूर, वैजापूर, नेवासा, शेवगाव या धरणालगत असलेल्या तालुक्‍यांमध्ये अत्यंत कमी पाऊस झालेला आहे. परंतु नाशिक आणि नगर जिल्ह्यातील गंगापूर, करंजवन, भावली, दारणा, भंडारदरा, निळवंडे आदी 22 धरणे आणि बंधारे भरून वाहत असल्याने जायकवाडीमध्ये वेगाने पाणी येऊन दाखल होत आहे.

नाशिक परिसरामध्ये सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी नाशिक व नगर जिल्ह्यातून सोडण्यात आलेले धरणातील पाणी अजून दोन-तीन दिवस जायकवाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर येईल अशी अपेक्षा आहे.

जायकवाडी धरणाचे पाणी नगर, औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातील अनेक भागात सिंचनासाठी वापरले जाते. तसेच औरंगाबाद, पैठण, जालना, शेवगाव, पाथर्डी यासारख्या लहानमोठ्या शंभरावर गावांना धरणातून पाणी पुरवठा होतो. त्यामुळे मराठवाड्यात जायकवाडीच्या जलसाठ्यात वाढ होत असल्याने आनंद व्यक्त होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com