दिलेरखानाच्या गोटात संभाजी महाराज गेले नव्हते तर त्यांना पाठवण्यात आलं होतं.. - Jay ajit pawar about father move | Politics Marathi News - Sarkarnama

दिलेरखानाच्या गोटात संभाजी महाराज गेले नव्हते तर त्यांना पाठवण्यात आलं होतं..

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

इतिहासाचे दाखले देऊन अजितदादांच्या बंडाचे समर्थन

पुणे : अजित पवार यांचे बंड शमल्यानंतर अनेक कारणे या बंडामागची सांगण्यात येत आहे. अजितदादांना भाजपशी आघाडी करणयाचा प्लॅन हा शरद पवार यांचाच होता. त्यामुळे राष्ट्रपती राजवट उठली, असे काही मंडळी सांगत आहेत.

या साऱ्या प्रकारावर अजितदादांचे चिरंजीव जय यांनीही आपले मत व्यक्त केली आहे. `दिलेरखानाच्या गोटात छत्रपती संभाजी महाराज गेले नव्हते तर त्यांना पाठवण्यात आलं होतं...`, अशा आशयाची पोस्ट जय यांनी शेअर केली आहे. त्यांच्या या दाव्यामुळे अजितदादांचे बंड हे पूर्वनिजोजित होते, असा संदेश जात आहे.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही अशाच प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली. अजित पवारांना यापूर्वीच उपरती झाली असती तर हे सर्व टळले असते का? अशी विचारणा करण्यात आल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, `सर्व ठरल्याप्रमाणे झाले आहे.' एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराशी श्री. संजय राऊत बोलत होते. 

अजित पवार यांचे बंड पूर्वनियोजित होते का? अशी विचारणा केली असता श्री. संजय राऊत म्हणाले, `अनेक गोष्टी ठरल्याप्रमाणे झाल्या आहेत.' हे शरद पवारांनी ठरवले होते का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले, `मी मागेही म्हणालो होतो की शरद पवारांना समजावून घ्यायला भाजपला शंभर जन्म घ्यावे लागतील.' 

दिग्दर्शक कोण होते? असे विचारले असता ते म्हणाले, `ते जॉइंट व्हेन्चर होते. ते होते, आम्ही होतो, सगळेच होते.' 

दिग्दर्शक - स्क्रिप्ट कोणाचे होते? असे विचारले असता ते म्हणाले, `हे लवकरच कळेल.'  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख