जव्हार नगर परिषद निवडणूक `राष्ट्रवादी' स्वबळावर लढणार - Jawhar municipal council election | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

जव्हार नगर परिषद निवडणूक `राष्ट्रवादी' स्वबळावर लढणार

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

जव्हार नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तारीख जाहीर होण्याअगोदरच येथील राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. त्यासाठी आतापासून व्यूहरचना केली जात आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांनी दिली.

जव्हार : जव्हार नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तारीख जाहीर होण्याअगोदरच येथील राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. त्यासाठी आतापासून व्यूहरचना केली जात आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांनी दिली.
 
जव्हार नगर परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. आता होऊ घातलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेस स्वबळावर लढणार आहे. स्वबळावर पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेवर येईल, असा विश्‍वास पालघर जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांनी व्यक्त केला आहे. 

जव्हारमध्ये युती, आघाडीबाबत वेगवेगळी विधाने राजकीय पक्ष व संघटना करत असल्याने भुसारा यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. 

जव्हार प्रतिष्ठानचा गौप्यस्फोट 
जव्हार नगर परिषदेत दोन महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत चार जागा जिंकून प्रवेश केलेल्या जव्हार प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत पाटील यांनी यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आमच्याशी युती करण्यासाठी अनेकांनी निरोप दिल्याचा गौप्यस्फोट केला. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्याअगोदरच जव्हारमध्ये वातावरण तापले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सुनील भुसारा यांनी आपल्या पक्षाची बाजू मांडली. आमचा राष्ट्रीय पक्ष असून, आम्ही जव्हारमध्ये सत्तेत आहोत. त्यामुळे कोणत्याही संघटनेशी आमचा आघाडी करण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असेही भुसारा यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख