सीमेवरून जवानाचा आमदार सातपुतेंना थेट फोन !"" म्हणाले, आई एकटी आहे, किराणा सामान द्याल का ? 

भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुका सरचिटणीस संजय देशमुख स्वत: सर्व किरणा साहित्य घेऊन सातपुते यांच्या घरी गेले. ते त्यांनी सातपुते यांच्या आईकडे सुपुर्द केले.
सीमेवरून जवानाचा आमदार सातपुतेंना थेट फोन !"" म्हणाले, आई एकटी आहे, किराणा सामान द्याल का ? 

पुणे : ब्रह्मदेशाच्या सीमेवर असलेल्या जवानाने गावाला असलेल्या आईला किराणा सामान पोचविण्याची विनंती आमदाराला केली. किराणा दुकान दूर आहे. आणायला कुणी नाही, ही त्यांची मुख्य अडचण होती. आमदारांनी तत्काळ आपल्या कार्यकर्त्यामार्फत केवळ तासाभरातच किमान महिनाभर पुरेल इतके किराणा साहित्य पोच केले. 

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे सीमेचे रक्षण करणारा हा सैनिक भारावून गेला. माझ्या आयुष्यातील हा खूपच चांगला अनुभव असून अशी मदतीची भावना ठेवणाऱ्या लोकप्रतिनिधींची देशाला गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

सरकारनामाशी बोलताना सैनिक असलेल्या अमोल सातपुते यांनी हा अनुभव सांगितले. सातपुते हे माळशिरस (जि. सोलापूर) तालुक्‍यातील चांदापुरी या गावचे. गेल्या आठ वर्षापासून ते भारतीय सैन्यदलात सेवा करीत आहेत. भारत-ब्रम्हदेशाच्या सीमेवर सध्या ते कार्यरत आहेत. त्यांचे कुटुंब गावकडेच असते. मात्र, काही कारणाने त्यांच्या आई सध्या चांदापुरीत राहतात. 

ग्रामीण भागातही लॉकडाऊन काटेकोरपणे पाळले जात असल्याने किराणा सामानाची त्यांची अडचण झाली होती. या संदर्भात बोलताना सातपुते म्हणाले, आईसोबत सध्या घरी कुणीच नसल्याने किराणा आणण्याची अडचण होती. आमदार सातपुते यांना ही अडचण सांगितल्यानंतर तासाभरातच सर्व किराणा सामान घरी पोचवले. अडचण सांगितल्यानंतर लगेचच त्याची सोडवणूक करण्यात आली. माझ्या दृष्टीने हा अत्यंत चांगला अनुभव आहे. अशाप्रकारे अडचणीला धावून येणाऱ्या लोक प्रतिनिधींची गरज आहे. 

या संदर्भात सोलताना आमदार सातपुते म्हणाले, की कोरोनाचा मुकाबला करताना ग्रामीण जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्याच्या परिस्थितीत तालुक्‍यातून रोज सुमारे दोनशे फोन येतात. प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या असतात. त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परराज्यात तालुक्‍यातील अनेकजण अडकले आहेत. यात काही मजुरांचाही समावेश आहे. 

त्यांच्याशी संपर्क झाला आहे. ते ज्या ठिकाणी आहेत. त्याच ठिकाणी त्यांची राहण्याची व जेवणाची सोय करण्यात येत आहे. स्थानिक रोज नव्या अडचणी समोर येत आहेत. माझ्या परीने त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com