जवाहर साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध

साखर कारखानदारीमध्ये राज्यात जवाहर ने विविध पायंडे पाडून आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळेच आजतागायत कारखान्याची निवडणूक बिनविरोध होत आहे.हे सभासद शेतकऱ्यांच्या विश्वासाचे प्रतिक आहे.-कल्लाप्पाण्णा आवाडे
jawahar sugar factory election
jawahar sugar factory election

हुपरी (कोल्हापूर) : येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी डी. एस. हातरोटे यांनी आज झालेल्या कारखान्याच्या विशेष सर्व साधारण सभेत केली.

सभेनंतर झालेल्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत कारखान्याच्या अध्यक्षपदी संस्थापक अध्यक्ष माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांची तर उपाध्यक्षपदी बाबासाहेब चौगुले यांची बिनविरोध निवड झाली.

दरम्यान, आमदार प्रकाश आवाडे यांची स्वीकृत संचालक म्हणून संचालक मंडळात निवड करण्याचे सूतोवाच संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी केले.

जवाहर साखर कारखान्याच्या सन 2019 -2020 ते 2024 - 2025 या सालासाठीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत गुरूवारी( ता.5) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी 19 जागांसांठी 19 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले होते. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्याबाबतची अधिकृत घोषणा आज करण्यात आली.

नवनिर्वाचित संचालक असे, उत्पादक सभासद - (सर्वसाधारण) कल्लाप्पाण्णा आवाडे, राहूल आवाडे, बाबासाहेब चौगुले (कुंभोज), सूरज मधुकर बेडगे (हुपरी), आदगोंडा बाबगोंडा पाटील (हेरले), अशोक तिपाण्णा नारे (बेडकिहाळ), सुकूमार जिनाप्पा किणींगे (बुबनाळ),बसगोंडा शिवगोंडा पाटील, कुगे (चंदूर), अभयकुमार भालचंद्र काश्मिरे(रूई), संजयकुमार भूपाल कोथळी (अकिवाट), दादासाहेब नरसु सांगावे (अब्दुललाट), किसन अशोक अमण्णावर (बोरगांव य), गौतम बाबूराव इंगळे (कोथळी), सुमेरू सुरगोंडा पाटील ( सदलगा). महिला- कमल शेखर पाटील (सुळकूड), वंदना विजय कुंभोजे( गौरवाड). अनुसूचित जाती/जमाती- मानसिंग कृष्णा कांबळे (शहापूर). बिगर उत्पादक संस्था गट - विलास गणपती गाताडे( इचलकरंजी), अण्णासाहेब गोपाळा गोटखिंडे (यळगुड).

नव्या संचालक मंडळाच्या बैठकीत संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांची अध्यक्षपदी तर बाबासाहेब चौगुले यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली. कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या नांवाला आदगोंडा पाटील सूचक तर अशोक नारे अनुमोदक होते. बाबासाहेब चौगुले यांच्या नांवाला राहूल आवाडे सुचक म्हणून तर सुकूमार किणींगे अनुमोदक होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com