जावळीतील नेते पाण्यासाठी नागपूरात....

शिवसेनेचे माजी आमदार सदाभाऊ सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची नागपूरात भेट घेऊन निवेदन दिले.
shivsena_thakrey.
shivsena_thakrey.

मेढा : जावळी तालुक्‍याच्या पूर्व व पश्‍चिम भागातील 56 पेक्षा अधिक गावांना पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी वरदान ठरणाऱ्या बोंडारवाडी धरणाला तातडीने निधी उपलब्ध करून हा प्रकल्प मार्गी लावावा, या मागणीसाठी जावळीतील सर्वपक्षीय नेत्यांनी शिवसेनेचे माजी आमदार सदाभाऊ सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची नागपूरात भेट घेऊन निवेदन दिले.

जावळीतील 56 गावांत कितीही पिण्याच्या पाण्याच्या उपाययोजना केल्या तरी उन्हाळ्यात लोकांच्या वाटयाला दुष्काळ येतो.


त्यामुळे बोंडारवाडी धरण येथील जनतेची गरज आहे. त्यामुळे तातडीने बोंडारवाडी धरणाचे काम मार्गी लावण्यासाठी जावळीतील नेते थेट नागपूरात पोहोचले असून त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा करून मागण्यांचे निवेदन दिले.


यावेळी शिवसेनेचे माजी आमदार सदाशिव सपकाळ, सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, भाजपचे नेते विजयअप्पा शेलार, अभियंता सुनिल पोरे आदी उपस्थित होते.


बोंडारवाडी धरणासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही खुप प्रयत्न करून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रशासकीय मान्यता व विविध मंजूरी घेतल्या होत्या.

तसेच बोंडारवाडी धरणग्रस्त कृती समितीचे निमंत्रक विजय मोकाशी यांचे प्रारंभापासून ते आज पर्यंत धरणाच्या पुर्ततेसाठी प्रयत्न सुरू आहेत. अगदी माजी खासदार उदयनराजे पासून ते अनेक नेतेमंडळी यासाठी प्रयत्नशील आहेत.

मात्र, सत्ता बदल झाल्याने हा प्रश्न प्रलंबित राहू नये. मागे पडू नये यासाठी जावळीतील नेते मंडळीनी प्रारंभी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याबरोबर चर्चा केली . त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबरोबर चर्चा झाली.


त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत बैठक लावण्याचे आश्‍वासन दिल्याचे वसंतराव मानकुमरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com