कऱ्हाडला तीन, चार एप्रिलला जनता कर्फ्यू  

इस्लामपूर येथील परिस्थिती लक्षात घेता कऱ्हाडात संसर्ग वाढू नये यासाठी शहरातील जीवनाश्यक सेवेसह सर्वच व्यवहार लॉकजडाऊन ठेवले जाणार आहेत. शहरात सध्याची स्थिती लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने निर्णय घेतला आहे
Janta Curfew in Karad on Friday and Satruday
Janta Curfew in Karad on Friday and Satruday

कऱ्हाड (जि. सातारा) : इस्लामपूरच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाडात संसर्ग रोखण्यासाठी कऱ्हाड शहरात तीन व चार एप्रिलला जनता कर्फ्यू होणार आहे. या दोन दिवशी जीवनावश्यक सेवाही बंद राहणार असून नागरीकांनी आवश्यक वस्तू आणून ठेवाव्यात, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दिली आहे.

इस्लामपूर येथील परिस्थिती लक्षात घेता कऱ्हाडात संसर्ग वाढू नये यासाठी शहरातील जीवनाश्यक सेवेसह सर्वच व्यवहार लॉकजडाऊन ठेवले जाणार आहेत. शहरात सध्याची स्थिती लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने निर्णय घेतला आहे. कोरोनाची स्थिती येथे गंभीर स्वरूप धारण करत आहे. त्याला रोखण्यासाठी सलग दोन दिवसांचा लॉकडाऊन अत्यवश्यक आहे, असे डांगे यांनी स्पष्ट केले.

सध्या संचारबंदी सध्याच्या काळात नागरीक बाहेर फिरत आहेत. आतापर्यंत विनाकारण दुचाकीवरून फिरताना आढळलेल्यांची 150 वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. तरीही नागरीकांचे फिरणे कमी झालेले नाही. पोलिस, पालिका यंत्रणांनी सांगून नागरीक ऐकत नाहीत. त्यामुळे पूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याचे श्री. डांगे यांनी सांगितले. 

पालकमंत्री बाळासाहेब पाटील, पोलिस व जिल्हा प्रशासनास कल्पना देण्यात आली आहे. नागरीकांना शहरात भाजीपाला, किराणामाल घरपोच दिला आहे. शहरातील नव्वद टक्के लोक संचारबंदीच्या  नियमांचे पालन करून घरात बसली आहे. मात्र काही लोक विनाकारण फिरत आहेत. त्यांच्या अशा वागण्याने भविष्यात धोका होऊ शकतो. ही स्थिती लक्षात घेवून कोरोनाला रोखण्यासाठी शहरात तीन व चार एप्रिलला जनता कर्फ्यू होत आहे. पुणे, मुंबईसह परदेशातून आढळलेले नागरीक होम क्वारंटाईन केले आहेत. जिल्हा बंदी असल्याने अन्य जिल्ह्यातून येणारा ओघ कमी झाला असली तरी अद्याप काही नागरीक येत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com