जनसुराज्य हा भाजपची बी टीम नाही : कोरे

जनसुराज्य हा भाजपची बी टीम नाही : कोरे

वारणानगर : जनसुराज्यशक्ती पक्षाला 15 वर्षाची परंपरा आहे. आतापर्यंत विधानसभेच्या सर्व निवडणुका स्वतंत्रपणे लढविल्या आहेत.या निवडणुकीतही जनसुराज्यशक्ती पक्षाने जिल्हयात विधानसभेच्या चार जागा लढविल्या. यामध्ये जनतेने आम्हाला मतदान करून मोठा विश्वास दाखविला आहे. शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्यासह काही विरोधकांनी जनसुराज्य हा भाजपचा बी टीम पक्ष आहे, असा उल्लेख केला ही दुर्देवी बाब आहे.

जिल्हयात भाजपचा एकही विधानसभा सदस्य नसताना जनसुराज्याने त्याकाळी आपले विधानसभेत चार आमदार पाठविले.15 वर्षाची परंपरा असलेल्या जनसुराज्य पक्षाबाबत अशा प्रकारची टीका करुन विरोधकांनी जनसुराज्यशक्ती पक्षाला बदनाम करू नये, असे डॉ. विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कोरे म्हणाले, सन 2004 ला जिल्ह्यात जनसुराज्यशक्ती पक्षाची स्थापना झाली.त्यावेळी विधानसभेची निवडणूक जनसुराज्य पक्षाने स्वतंत्रपणे लढविली.पहिल्या प्रयत्नामध्ये पन्हाळा- गगनबावडा, हातकणंगले,चंदगड, आणि विदर्भातील एक अशा 4 जागावर आमदार म्हणून उमेदवार निवडणून आलेत. जिल्हयातील पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ, करवीर, राधानगरी, चंदगड- आजरा,कोल्हापूर उत्तर यासह राज्यातील अनेक जिल्हयात जनसुराज्य शक्ती पक्षाने विधानसभेच्या यापूर्वी जागा लढविल्या. त्यामध्ये अनेक मतदारसंघात जनसुराज्यला दोन-तीन क्रमांकाची मते पडलीत. याचाही विचार विरोधकांनी करावा.

सध्या जिल्हयातील महानगरपालिका, जिल्हा बॅंक,जिल्हा परिषद,बाजार समिती यासह अनेक ठिकाणी जनसुराज्याने आपली एक वेगळी ताकद निर्माण केली आहे. हा पक्ष लहान असला तरी पक्षाची मोठी ताकद आहे. त्यामुळे विरोधकांनी बोलताना जनसुराज्य पक्षाची पूर्ण माहीती घेवून बोलावे असे कोरे यांनी सांगून विरोधकांनी जनसुराज्याबाबत केलेल्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com