Jankar Mahajan Present for Sujay Vikhe's Nomination Filing | Sarkarnama

डाॅ. सुजय विखेंच्या मदतीला महाजन, जानकर

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 एप्रिल 2019

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या वतीने डाॅ. सुजय विखे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर उपस्थित राहिले. डाॅ. विखे यांचे आज चार अर्ज दाखल करण्यात आले. यानिमित्त केलेले शक्तीप्रदर्शन लक्षवेधी होते.

नगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या वतीने डाॅ. सुजय विखे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर उपस्थित राहिले. डाॅ. विखे यांचे आज चार अर्ज दाखल करण्यात आले. यानिमित्त केलेले शक्तीप्रदर्शन लक्षवेधी होते.

विखे पाटील अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शन करणार, हे निश्चित होते. त्यासाठी आज सकाळपासूनच कार्यकर्ते शहरात दाखल झाले. शहरातील मुख्य रस्त्यावरून निघालेल्या रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत झाले. अर्ज भरताना महाजन, जानकर यांच्यासह विधानसभेचे उपाध्यक्ष विजय आैटी, पालकमंत्री प्रा. राम शिंदे हेही उपस्थित होते. रॅलीमध्ये खासदार दिलीप गांधी, माजी मंत्री बबनराव पाचपुते, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, आमदार मोनिका राजळे, आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे, धनश्री विखे आदी उपस्थित होते.

गांधींच्या उपस्थितीकडे लक्ष
मागील चार दिवसांपूर्वी विखे पिता-पुत्रांनी खासदार गांधी यांची समजूत घातल्याने गांधी यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले खरे, परंतु, गांधी यांचे पूत्र सुवेंद्र गांधी यांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. येत्या दोन दिवसांत ते हे अर्ज भरणार असल्याचे समजते. वडील (खा. गांधी) विखेंना मदत करीत असताना त्याच मतदारसंघातून पूत्र (सुवेंद्र गांधी) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी करीत आहेत. त्यामुळे खासदार गांधी यांची भूमिका नेमकी कशी असेल, याबाबत संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख