Janashirwad Yatra is not for Political Gains Claims Adityra Thakre | Sarkarnama

जनआशीर्वाद यात्रा राजकीय नाही : आदित्य ठाकरेंचा दावा

राजकुमार शहा
बुधवार, 31 जुलै 2019

''शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा ही राजकीय नसून ज्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत सहकार्य केले, ज्यांनी मते दिली ज्यांनी दिली नाहीत, त्यांचे आभार मानण्यासाठी ही यात्रा आहे, मते मागण्यासाठी किंवा येत्या निवडणुकीचा या यात्रेची काहीही संबंध नाही, माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र घडविण्यासाठी व युवकांची ताकद एक वाटण्यासाठी माझा प्रयत्न आहे," असे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

मोहोळ : ''शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा ही राजकीय नसून ज्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत सहकार्य केले, ज्यांनी मते दिली ज्यांनी दिली नाहीत, त्यांचे आभार मानण्यासाठी ही यात्रा आहे, मते मागण्यासाठी किंवा येत्या निवडणुकीचा या यात्रेची काहीही संबंध नाही, माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र घडविण्यासाठी व युवकांची ताकद एक वाटण्यासाठी माझा प्रयत्न आहे," असे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

युवासेनेची जन आशीर्वाद यात्रा मोहोळ येथे आल्यानंतर ठाकरे बोलत होते, त्यांचे मोहोळ तालुका शिवसेनेच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, प्रा. शिवाजीराव सावंत, महेश कोठे, दिपक गायकवाड ,महेश देशमुख, बाळासाहेब गायकवाड, काका देशमुख, तालुकाप्रमुख अशोक भोसले, मनोज शेजवाल, संभाजी शिंदे, चरणराज चवरे, सीमा पाटील , ज्योती नागणे, मनोज नागणे, अतुल गावडे, सुधिर गोरे, अमित वाघमारे, राम कोरके, सत्यवान देशमुख, विकी देशमुख, सिकंदर बोंगे, नागेश वनकळसे , बाळासाहेब वाघमोडे, नंदा गोरे आदीसह ग्रामीण भागातील शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठाकरे पुढे म्हणाले, ''कामगार, शेतकरी ,युवक, तरुणी यांचा आवाज मंत्रालयापर्यंत गेला पाहिजे.माझे मत परिवर्तन हे मोहोळ पासून झाले असून तालुक्यातील गावे ही ऐतिहासिक आहेत, त्यामुळे माझे मोहोळशी  विशेष नाते जडले आहे. जो पर्यंत सरसकट कर्जमाफी होत नाही तोपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही. पीक विम्यासाठी  शिवसेनेने प्रथमच मोर्चा काढला, विमा कंपन्या शेतकऱ्यांचे 17 कोटी रुपये देणे होत्या, मात्र मोर्चामुळे त्यातील 14 कोटी रुपये तातडीने  शेतकऱ्यांना मिळाले, उर्वरित तीन कोटी रुपये थोड्याच दिवसात शेतकऱ्यांना मिळणार आहेत.'' बेरोजगारी, प्रदूषण, व दुष्काळ मुक्त महाराष्ट्र साठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले. यावेळी ठाकरे यांना अनेकांनी निवेदने दिली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख