मंत्री जानकर यांनी एक महिन्याचा पगार उत्तम बंडू तुपे यांना दिला!

मंत्री जानकर यांनी एक महिन्याचा पगार उत्तम बंडू तुपे यांना दिला!

पुणे : "उत्तम बंडू तुपे यांनी माण-खटाव तालुक्याचे नाव सर्वदूर पोहोचवले. माणदेश त्यांच्या ऋणात राहील.तुपे यांच्यामुळे `झुलवा` नाटकामुळे सयाजी शिंदे यांच्यासारख्या अभिनेत्याचा मराठी रंगभूमीवर प्रवेश झाला. तुपे यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्याना पद्मश्री मिळावा म्हणून मी प्रयत्न करेन,"अशी ग्वाही राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी वडूज (जि. सातारा )येथे बोलताना दिली.

जेष्ठ लेखक उत्तम बंडू तुपे यांचे मूळ गाव खटाव तालुक्यातील एनकुल. माण आणि खटाव तालुक्यातील जनतेच्या वतीने तुपे यांना 'डॉ वसंतराव घाटगे जीवनगौरव पुरस्कार 'देण्यात आला. यावेळी जानकर बोलत होते.

कार्यक्रमाचे संयोजक रणजितसिंह देशमुख, माजी आमदार दिलीप येळगावकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, भाजपचे नेते अनिल देसाई, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संदीप पोळ,आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जानकर यांनी सांगितले की माण आणि खटाव तालुक्याला अभिमान वाटावा असे काम साहित्यात तुपे यांनी केले आहे. त्यांच्या साहित्यातून सामान्य माणसांची दुःख समोर आली. दुष्काळी भागातील माणसाच्या व्यथा वेदनांना आवाज देण्याचं काम त्यांनी केलं आहे. आजवर त्यांची उपेक्षा झाली पण आता त्यांची उपेक्षा होणार नाही. त्याना `पद्मश्री` मिळावा, म्हणून मी स्वतः प्रयत्न करणार आहे." यावेळी जानकर यांनी त्याना मंत्री म्हणून मिळणारा एक महिन्याचा पगार तुपे यांना देण्याचे जाहीर केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com