Jamkhed Shevgav Win is Curtain Raiser for 2019 | Sarkarnama

जामखेड, शेवगावमध्ये भाजपचा विजय म्हणजे २०१९ ची रंगीत तालीम : भानुदास बेरड

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

जामखेड नगरपरिषदेत जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांचे वर्चस्व आहे. साहजिकच तेथे भाजपचेच निर्विवाद वर्चस्व होते. शेवगाव नगरपरिषदेत भाजपचेच नगराध्यक्ष राणी मोहिते यांना, तर उपनगराध्यक्षपदी अपक्ष असलेले, पण भाजपच्या विचाराशी जोडलेले वजीर पठाण यांना संधी देण्यात आली.

नगर : शेवगाव व जामखेड या दोन्हीही नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने कमळ फुलविले. हा विजय म्हणजे २०१९ ची रंगीत तालीम आहे. दोन्हीही ठिकाणी उपनगराध्यक्षपदी मुस्लिम समाजाला संधी देऊन पक्षाने अल्पसंख्यांक समाजाला एक विश्वास दिला आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी दिल

जिल्ह्यातील मुस्लिम समाज भाजपच्या जवळ येतआहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने कितीही अपप्रचार केला, तरीही भाजपच्या वाटचालीवर काहीही परिणाम होणार नाही, असे मत प्रा. बेरड यांनी व्यक्त केले. जामखेड नगरपरिषदेत जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांचे वर्चस्व आहे. साहजिकच तेथे भाजपचेच निर्विवाद वर्चस्व होते. शेवगाव नगरपरिषदेत भाजपचेच नगराध्यक्ष राणी मोहिते यांना, तर उपनगराध्यक्षपदी अपक्ष असलेले, पण भाजपच्या विचाराशी जोडलेले वजीर पठाण यांना संधी देण्यात आली. त्यामुळे शेवगावमध्येही भाजपचेच वर्चस्व राहिले. यानिमित्ताने प्रा. बेरड यांनी 'सरकारनामा'शी प्रतिक्रिया व्यक्त करताना पुढील विधानसभा-लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची यत्रणा सज्ज असून, सर्वच ठिकाणी भाजप आघाडीवरच राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

सरकारनामा अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख