जामखेडमध्ये दुसऱ्या दिवशी कुठे माशी शिंकली?

आज केवळ उपसभापतीपदाची निवड होऊ शकली. मात्र मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, याबाबत कसलीही माहिती माध्यमांना सांगण्यास नकार दिला. त्यामुळे
jamkhed panchayat samiti election
jamkhed panchayat samiti election

जामखेड (नगर) : जामखेड पंचायत समितीच्या सभापतीपदाची दुसर्‍या दिवशीही निवड होऊ शकली नाही. सभापतीपदासाठी दाखल झालेला ऐकमेव अर्ज शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने ही निवड झाली नाही. त्यामुळे केवळ उपसभापतीपदाची निवड होऊ शकली.

उपसभापतीपदी भाजपाच्या मनीषा सुरवसे यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार व भाजपचे माजी आमदार राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही रस्सीखेच असल्याने नेमकी कोणत्या आदेशाने ही माघार घेतली, याबाबत चर्चा सुरू आहे.

जामखेड पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवडणूक जाहीर झाल्यापासून नाट्यमयरित्या घडामोडी होत आहेत. पहिल्यांदा सभापती पदाचे निघालेले आरक्षण अनुसूचीत जमातीसाठी होते, मात्र या प्रवर्गातून निवडून आलेला एकही सदस्य नसल्याने फेर आरक्षण काढावे लागले. त्यामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षण निघाले. या प्रवर्गातील दोन सदस्य असल्याने दोघांनीही ही सभापतीपदासाठी मोर्चेबांधणी केली, मात्र मंगळवारी (ता. 7) निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी या दोन्ही पदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने पीठासीन अधिकारी जयश्री माळी यांना निवडणूक एक दिवस पुढे ढकलावी लागली होती, त्यानुसार आज सभापतीपदासाठी राजश्री सुर्यकांत मोरे, तर उपसभापती पदासाठी मनीषा रवींद्र सुरवसे या दोघींनी उमेदवारी अर्ज दाखल केले. 

अर्ज दाखल करण्याच्या वेळेत केवळ या दोघींचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवड प्रक्रिया बिनविरोध होईल, असे चित्र निर्माण झाले. कार्यकर्त्यांनीही गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष केला, मात्र उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या मुदत संपण्यास अवघे पाच मिनिट वेळ शिल्लक असताना काय राजकीय नाट्य घडले हे समजले नाही, मात्र सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या राजश्री मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. 

विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान राजश्री मोरे या राष्ट्रवादीत गेल्या आहेत. त्यांनी आमदार रोहित पवार यांचा प्रचार केला होता. या पार्श्वभूमीवर ही रखडलेली निवड विशेष चर्चिली जात आहे.

आज केवळ उपसभापतीपदाची निवड होऊ शकली. मात्र मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, याबाबत कसलीही माहिती माध्यमांना सांगण्यास नकार दिला. त्यामुळे जामखेड पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवड निवडणूक शाखेच्या पुढील कार्यक्रम जाहीर होण्यावर अवलंबून राहिली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com