jalna-ashok-chavan-raosaheb-danave | Sarkarnama

राफेल करार प्रकरणी अशोक चव्हाणांनी मला अक्कल शिकवू नये : रावसाहेब दानवे

भास्कर बलखंडे  
रविवार, 16 सप्टेंबर 2018

मला राफेलही कळतो आणि आदर्शचा घोटाळाही  कळतो. राफेल आणि आदर्श घोटाळ्यावर जाहीरपणे चर्चा करण्याची आपली केव्हाही तयारी आहे. त्यामुळे कॅांग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी मला या विषयी अक्कल शिकवू नये, अशी जळजळीत प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी रविवारी (ता.16) येथे व्यक्त केली. राफेल घोटाळा हा कॉंग्रेसच्या काळात झाल्याचा पलटवारही खासदार दानवे यांनी केला.

जालना : मला राफेलही कळतो आणि आदर्शचा घोटाळाही  कळतो. राफेल आणि आदर्श घोटाळ्यावर जाहीरपणे चर्चा करण्याची आपली केव्हाही तयारी आहे. त्यामुळे कॅांग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी मला या विषयी अक्कल शिकवू नये, अशी जळजळीत प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी रविवारी (ता.16) येथे व्यक्त केली. राफेल घोटाळा हा कॉंग्रेसच्या काळात झाल्याचा पलटवारही खासदार दानवे यांनी केला.

राफेल करार कॉंग्रेसच्या काळात
राफेल करार हा खासदार दानवे यांच्या डोक्याबाहेरचा विषय असल्याची टिप्पणी खासदार चव्हाण यांनी नुकतीच केली होती. या टिकेचा धागा पकडून खासदार दानवे यांनी आज या प्रकरणावरून अशोकराव चव्हाणांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, राफेल करार हा कॅांग्रेसच्या काळात झाला आहे. त्यामुळे तुम्हाला (चव्हाणांना) रायफल वाटत असावे. भाजपने राफेल करारात काही महत्वाचे बदल केल्याने कॅांग्रेसचा तिळपापड होत आहे.या प्रकरणावर जाहीरपणे चर्चा करायला आपण कोणत्याही क्षणी तयार असल्याचे आव्हान खासदार दानवे यांनी खासदार अशोक चव्हाण यांना दिले.

मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार 
राज्यमंत्रिमंडळात येत्या आठवडाभरात विस्तार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करून खासदार दानवे म्हणाले की, मराठवाड्यातील काही चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार आहे. काही मंत्र्यांकडील खात्यांमध्ये बदल होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यपाल सी. विद्यासागर राव सोमवारी (ता.16) जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्याच्या तयारीची माहिती त्यांनी दिली.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख