जलील स्वतःला अजून निजामाचे गुलाम समजतात काय - मनिषा कायंदे

जलील स्वतःला अजून निजामाचे गुलाम समजतात काय - मनिषा कायंदे

औरंगाबाद : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमाला यावेळीही औरंगाबादच खासदार इम्तियाज जलील यांनी दांडी मारली. गेली अनेक वर्षे ते या कार्यक्रमाला हजर राहत नाहीत. आझ त्यावरून शहरात चर्चा सुरू असतानाचा शिवसेनेच्या प्रवक्‍त्या मनीषा कायंदे यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे वावडे आहे का ?असा सवात त्यांनी केला आहे 

जलील अजूनही स्वतःला निजामाचे गुलाम समजतात काय? असं असेल तर त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि सरकारने त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना प्रवक्‍त्या मनीषा कायंदे यांनी केली आहे. 

आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. मात्र खासदार इमतियाज जलील आजही औरंगाबाद येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिले, यावरून शहरात बरीच चर्चासुरू आहे. कालही सोशल मिडीयावर याची चर्चा सुरू असतान जलील यांनी मराठवाड्यातील जनतेच्या भावनांचा कसालही विचार न करता अत्यंत उद्दाम भाषेत नेटकरी मंडळींना उत्तर दिली, ज्यांनी त्यांना मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास सांगून या कार्यक्रमाला येणे कसे आवश्‍यक आहे ते पटवून द्यायचा प्रयत्न केला त्याची खिल्ली उडवून मूळ विषयाला बगल देत आपण स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाला कसे उपस्थित राहतो याचे दाखले देत उलट हा कार्यक्रम आपल्या दृष्टीने कस कमी महत्वाचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. पक्षाचा कार्यक्रम पूर्वनियोजित असल्याने आपण या कार्यक्रमाला येणार नाही असेही त्यांनी कालच सांगून टाकले. खासदार म्हणून शहराचा प्रथम नागरिक असताना ते आज औरंगाबादमधून निघून गेले आणि मुख्यमंत्री कोल्हापूरहगून औरंगाबादला आले या गोष्टीची चर्चा औरंगाबादमध्ये आवर्जून होत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com