jalil slams on shivsena and bjp | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

महापालिका आयुक्त महापौरांच्या हातचे बाहुले झाले आहेत काय ? - इम्तियाज जलील

जगदीश पानसरे
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद : जनतेने निवडून दिलेल्या आमच्या पक्षाच्या नगरसेवकांवर महापौर नंदकुमार घोडेले सुडापोटी कारवाई करत आहेत. दिवाळीच्या तोंडावर कमिशन घेऊन मर्जीतल्या कंत्राटदारांची बीले काढण्यात एमआयएमचे नगरसेवक अडथळा ठरत आहेत, म्हणून त्यांचे सदस्यत्व रद्द केले गेले असा गंभीर आरोप एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केला. 

औरंगाबाद : जनतेने निवडून दिलेल्या आमच्या पक्षाच्या नगरसेवकांवर महापौर नंदकुमार घोडेले सुडापोटी कारवाई करत आहेत. दिवाळीच्या तोंडावर कमिशन घेऊन मर्जीतल्या कंत्राटदारांची बीले काढण्यात एमआयएमचे नगरसेवक अडथळा ठरत आहेत, म्हणून त्यांचे सदस्यत्व रद्द केले गेले असा गंभीर आरोप एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केला. 

महापालिकेतील गैरकारभाराला वेसण घालण्याची जबाबदारी प्रशासनाचा प्रमुख म्हणून आयुक्तांवर असते. पण या सगळ्या प्रकरणांवर ते तोंड बंद करून बसले आहेत, आयुक्त महापौरांच्या हातचे बाहुले बनले आहेत काय? असा संतप्त सवाल देखील इम्तियाज जलील यांनी सरकारनामाशी बोलतांना केला. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज पुन्हा गोंधळ उडाला. 

एमआयएमचे वादग्रस्त नगरसेवक सय्यद मतीन यांना सभागृहात प्रवेश देऊ नका अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली आणि महापौरांनी देखील ती मान्य करत मतीन यांना प्रवेश नाकारला. यापुर्वीच्या सर्वसाधारण सभेत देखील महापौरांच्या आदेशावरूनच मतीन यांना प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले होते. आज (ता.1) दुपारी सर्वसाधारण सभेसाठी आलेल्या सय्यद मतीन यांना पुन्हा सभागृहात प्रवेश नाकारल्यामुळे एमआयएमचे इतर नगरसेवक संतप्त झाले. सभागृहात महापौरांच्या आसना समोरील मोकळ्या जागेत जाऊन त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. वारंवार सूचन करून देखील नगरसेवक ऐकत नसल्याने अखेर महापौर नंदकुमार घोडेले यांनी एमआयएमच्या पंधरा नगरसेवकांचे सदस्य रद्द केले. 

सभागृहात एमआयएमचा अडसर? 

एमआयएम नगरसेवकांवरील कारवाईनंतर आमदार इम्तियाज जलील चांगलेच संतापले. सरकारनामाशी बोलतांना ते म्हणाले, सध्या महापालिकेचा कारभार सत्ताधारी पक्षाचे प्रमुख चार पदाधिकारीच चालवत आहेत. कंत्राटदारांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांना फायदा कसा पोहचेल असाच प्रयत्न महापौरांकडून सुरू आहे. भाजप नगरसेवकांचा देखील त्यांना पाठिंबा आहे. केवळ आमच्या पक्षाचे नगरसेवकच त्यांना सभागृहात कडाडून विरोध करतात. 

त्यामुळेच महापौरांना आमच्या नगरसेवकांचा अडसर ठरतो आहे. सध्या महापालिकेत कंत्राटदारांची बिले काढण्याची स्पर्धा सुरू आहे. हे करत असतांना जो सर्वाधिक जास्त कमिशन देईल त्या कंत्राटदाराचे बिल काढले जाते असा आरोप देखील इम्तियाज जलील यांनी केला. विशेष म्हणजे कंत्राटदारांची बिले काढण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना असतात. पण हे अधिकार देखील त्यांनी महापौरांना देऊन टाकले आहेत. 

महापालिकेच्या सभागृहात नगरसेवकांना बोलण्याचा अधिकार आहे. आमचे नगरसेवक तेच करत होते, पण महापौरांनी त्यांचा बोलण्याचा अधिकार हिरावून घेत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई केली. एमआयएम नगरसेवकांच्या बाबतीत हा प्रकार वारंवार हेतूपुरस्पर केला जातोय. जेणेकरून नगरसेवकांनी आपला संयम सोडून टोकाची भूमिका घ्यावी आणि त्या आधारे या नगरसेवकांना निलंबित करता यावे असा महापौरांचा डाव दिसतोय. महापालिका आयुक्त निपुण विनायक यावर तोंडच उघडत नसल्यामुळे या सर्वप्रकाराला त्यांची देखील संमती आहे की काय? अशी शंका यायला लागली आहे असा आरोप देखील इम्तियाज जलील यांनी केला आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख