तीन महिन्यांचे उपमहापौरपद नको, पाच वर्षांची सत्ता मिळवणार - इम्तियाज जलील

तीन महिन्यांचे उपमहापौरपद नको, पाच वर्षांची सत्ता मिळवणार - इम्तियाज जलील

औरंगाबाद : सत्ताधारी शिवसेना-भाजपने महापालिकेची संपूर्णपणे वाट लावली आहे, इथल्या गलिच्छ राजकारणामुळे त्यांनी आम्हाला एखादे पद देऊ केले तरी त्यामध्ये आम्हाला रस नाही. तीन महिन्याचे उपमहापौरपद हे आमचे ध्येय नाही, तर आगामी महापालिका निवडणुकीत जोरदार कामगिरी करत पाच वर्षांची सत्ता मिळवण्यासाठी आम्ही जोर लावणार आहोत असे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी "सरकारनामा' शी बोलतांना सांगितले. 

शिवसेना-भाजपच्या अंतर्गत वादातून भाजपच्या उपमहापौरांनी काही दिवसांपुर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे उपमहापौरपदाची निवडणूक होत आहे. एमआयएम उमेदवार देणार का ? त्यांची पुढील रणनिती काय असेल ? या संदर्भात इम्तियाज जलील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. इम्तियाज म्हणाले, औरंगाबाद महापालिका शिवसेना-भाजपच्या भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. त्यामुळे फक्त तीन महिन्यांसाठीच्या उपमहापौरपदासाठी एमआयएम कुणापुढे हात पसरणार नाही. आमचे लक्ष्य एप्रिल 2020 मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका जिंकून संपूर्ण पाच वर्ष सत्ता मिळवणे हे आहे. त्यादृष्टीने आम्ही कामाला लागलो आहोत. 

त्यामुळे उपमहापौरपदाच्या निवडणुकीत उमेदवार द्यायचा की नाही ? मतदानात सहभागी व्हायचे की नाही ? या संदर्भात अद्याप कुठलीच चर्चा किंवा निर्णय घेतलेला नाही. मी दिल्लीत असल्यामुळे नगरसेवक व एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांशी माझे बोलणे झालेले नाही. लवकरच त्यांच्याशी चर्चा करून उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काय भूमिका घ्यायची हे ठरवू असेही इम्तियाज जलील यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com