jalil and zambad | Sarkarnama

पृथ्वीराज चव्हाणांवर टीका करण्याची इम्तियाज जलील यांची लायकी नाही- सुभाष झांबड

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

औरंगाबाद : हिंदूच्या विरोधात मुस्लिमांची माथी भडकावून, निर्माण केलेल्या लाटेवर निवडूण आलेल्या एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांची आमचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टिका करण्याची लायकी नाही अशा शब्दांत कॉंग्रेसचे आमदार सुभाष झांबड यांनी इम्तियाज जलील यांच्यावर तोफ डागली. पृथ्वीराज चव्हाण हे आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. कॉंग्रेसची सत्ता असतांना पंतप्रधान कार्यालयाचे कामकाज त्यांनी केले. इंजिनिअर असलेल्या आणि अमेरिकेत उच्चशिक्षण घेतलेल्या मोठ्या व्यक्तीवर टीका करतांना इम्तियाज जलील यांनी तारतम्य बाळगायला हवे होते. 

एमआयएम हा जातीयवादी पक्ष आहे ही पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली टीका अगदी योग्यच आहे. त्यामुळे इम्तियाज जलील यांना ती झोंबण्याची गरज नाही. आतापर्यंत मुस्लिम समाजाने कॉंग्रेसला भरभरून मते दिली, राज्यात व केंद्रात वर्षानुवर्ष सत्ता दिली हे खरचं आहे. पण मुस्लिमांनी कॉंग्रेसला जी मते दिली ती आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत म्हणूनच दिली. तुमचा पक्ष मात्र मुस्लिमांना हिंदूंच्या विरोधात भडकावून, जातीयवादी भूमिका घेऊन निवडणूका लढवत आला आहे. जातीयवादामुळे निर्माण झालेल्या लाटेवरच तुम्ही निवडून आला आहात. 

पृथ्वीराज चव्हाण यांच्या सारख्या अनुभवाने, वयाने मोठ्या असलेल्या नेत्यांबद्दल बोलण्याचा तुम्हाला अजिबात अधिकार नाही, तुमची तेवढी लायकी देखील नाही असा घणाघाती हल्ला सुभाष झाबंड यांनी इम्तियाज जलील यांच्यावर चढवला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख