उध्दव ठाकरेंनी आता पराभवाची सवय करून घ्यावी - इम्तियाज जलील

उध्दव ठाकरेंनी आता पराभवाची सवय करून घ्यावी - इम्तियाज जलील

औरंगाबाद : उध्दव ठाकरे यांनी आता पराभवाची सवय करून घ्यावी, ही तर सुरवात आहे. चार महिन्यांनी पुन्हा मैदानात उतरू तेव्हा विधानसभा निवडणुकीत आपला आमना-सामना होईल, असा टोला एमआयएम-वंचित बहुजन आघाडीचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना लगावला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएम मराठवाड्यात सात आमदार निवडून आणेल असा दावाही त्यांनी यावेळी केला. 

औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे यांचा झालेला पराभव केवळ त्यांचा नाही तर तो माझाही पराभव आहे अशी खंत उध्दव ठाकरे यांनी जालना येथे व्यक्त केली होती. यावर बोलतांना इम्तियाज जलील यांनी हैदराबाद येथे पक्षाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात उध्दव ठाकरेंना टोला लगावला. औंरगाबाद लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या गडाला हादरा देत विजय संपादन केल्यामुळे इम्तियाज जलील यांचा आत्मविश्‍वास वाढला आहे. हैदराबाद येथील सत्कार समारंभात केलेल्या भाषणातून त्यांनी तो दाखवून दिला. 

उध्दव ठाकरे यांच्या विधानाला उत्तर देतांना इम्तियाज जलील म्हणाले, एमआयएमच्या औरंगाबादेतील विजयाने महाराष्ट्रात चिंतन बैठका सुरू आहेत. उध्दव ठाकरेंनी हा पराभव एकट्या खैरेंचा नाही, तर माझा असल्याचे म्हटले आहे. पण त्यांनी आता असे पराभव पचवण्याची सवय लावून घ्यायला हवी. चार महिन्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा आम्ही मैदानात उतरू तेव्हा मराठवाड्यात एमआयएमचे सात आमदार निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. 

तेलंगणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे सात आमदार निवडूण आले आहेत. मराठवाड्यात देखील आम्ही पक्षाला इतकेच आमदार देऊ असा दावा देखील इम्तियाज यांनी केला. दीडशे वर्षापुर्वीच्या कॉंग्रेस पक्षाने महाराष्ट्रात लोकसभेच्या 24 जागा लढवल्या आणि त्यांचा एक उमेदवार विजयी झाला. आम्ही राज्यात एकच जागा लढवली आणि तीही निवडून आणली. 

आगामी विधानसभा निवडणुकीत अर्धे हैदराबाद औरंगाबादेत असेल, खांद्याला खांदा लावून प्रचार करू आणि एमआयएमचे आमदार मराठवाड्यात निवडून आणू असे आवाहन इम्तियाज जलील यांनी हैदराबादेतील एमआयएमच्या कार्यकर्त्यांना केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com