मतदारांचे आभार मानण्यासाठी इम्तियाज जलील ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर

 मतदारांचे आभार मानण्यासाठी इम्तियाज जलील ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर

औरंगाबाद : हैदराबाद येथील सत्कार स्वीकारून औरंगाबादेत परतलेले खासदार इम्तियाज जलील लगेच ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर निघाले. कन्नड तालुक्‍यातील अनेक गावांना भेटी देऊन त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजयी केल्याबद्दल मतदारांचे आभार मानले. हा दौरा विजयोत्सव साजरा करण्यासाठी आहे, यापुढचा दौरा हा विकासकामांसाठीचा असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. 

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा पराभव करून एमआयएम-वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील निवडूण आले. राज्यात एकमेव औरंगाबादची जागा लढवणाऱ्या एमआयएमने इथे विजय संपादन करत शंभर टक्के यश प्राप्त केल्याचे इम्तियाज जलील यांनी आपल्या हैदराबाद येथील दौऱ्यात सांगितले होते. तीन दिवस हैदराबादमधील सत्कारांचा स्वीकार केल्यानंतर आता इम्तियाज जलील यांनी जिल्ह्यातील मतदारांचे आभार मानण्यासाठी ग्रामीण भागाचा दौरा सुरू केला आहे. कन्नड तालुक्‍यातील अनेक गांवात त्यांनी आज भेट दिली आणि जनतेच्या वतीने करण्यात आलेल्या सत्काराबद्दल आभार मानले. 

वीस वर्षापासून शिवसेनेचा खासदार निवडून येणाऱ्या औरंगाबादेत एमआयएमने मिळवलेला विजय मोठा समजला जातो. आपल्याला केवळ दलित-मुस्लिमच नाही तर सर्वधर्मीयांनी मतदान केले. त्यांच्यामुळेच मी निवडून आलो अशी कबुली इम्तियाज जलील वेळोवेळी आपल्या भाषणातून देतात. आज प्रत्यक्ष मतदारांचे आभार मानण्यासाठी त्यांनी कन्नड तालुक्‍याचा दौरा केला. 

लोकांचा प्रतिसाद आणि प्रेम पाहून आपण भारावून गेलो आहोत, हे सांगतानाच सध्या आपण विजयोत्सव साजरा करत मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी आलो आहोत. या पुढचा दौरा मात्र लोकांचे प्रश्‍न सोडवून विकासकामे करण्यासाठीचा असेल असेही इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले. लोकांना आपल्या समस्या मांडता याव्यात त्यासाठी लवकरच प्रत्येक तालुक्‍यात संपर्क कार्यालय सुरू करणार असल्याचेही इम्तियाज यांनी यावेळी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com