समोरचा उमेदवार ठरू द्या, मग एमआयएमची भूमिका जाहीर करू - इम्तियाज जलील

 समोरचा उमेदवार ठरू द्या, मग एमआयएमची भूमिका जाहीर करू - इम्तियाज जलील

औरंगाबाद : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी शिवसेना-भाजप, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून कोण उमेदवार मैदानात येतो याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्यांचे पत्ते आधी ओपन होऊ द्या, मग आम्ही आमची भूमिका जाहीर करू असे मत खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारनामाशी बोलतांना व्यक्त केले. येत्या 19 ऑगस्ट रोजी औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी मतदान होत आहे. 656 मतदारांमध्ये एमआयएमच्या 25 जणांचा देखील समावेश आहे. 

औरंगाबाद महापालिकेत 25 नगरसेवकांसह एमआयएम प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. महापालिकेतील 25, एक स्वीकृत सदस्य व कन्नड, फुलंब्री नगरपालिकेतील प्रत्येकी एक असे एकूण 29 सदस्यांचे निर्णायक संख्याबळ एमआयएमकडे आहे. त्यामुळे या निवडणुकीत एमआयएमची नेमकी भूमिका काय असेल याकडे सगळ्याचे लक्ष आहे. 

या संदर्भात एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांच्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, निवडणूक जाहीर झाली असली तरी युती, आघाडीचा उमेदवार कोण असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आमच्याकडे निवडून येण्याइतके संख्याबळ नसल्याने उमेदवार देण्याचा प्रश्‍नच येत नाही. परंतु आमच्याकडे असलेल्या 29 सदस्यांनी निवडणुकीत नेमकी कोणती भूमिका घ्यायची हे आम्ही समोर उमेदवार कोण आहे? हे बघून ठरवणार आहोत. 

राज्य आणि देशपातळीवर आमचा शिवसेना-भाजप, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला विरोध आहे. या दोन पक्षा व्यतिरिक्त अपक्ष किंवा इतर कुणी उमेदवार निवडणुक मैदानात उतरतो का ? याकडे देखील आम्ही लक्ष ठेवून आहोत. प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यावरच आम्ही एमआयएमची भूमिका स्पष्ट करू असे सांगत इम्तियाज जलील यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com