जागावाटपासाठी खासदार इम्तियाज जलील हैदराबादेत तळ ठोकून

जागावाटपासाठी खासदार इम्तियाज जलील हैदराबादेत तळ ठोकून

औरंगाबाद : आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या जागा वाटपाबाबत 26 ऑगस्टला प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी यांची बैठक होणार आहे. याच बैठकीतून दोन्ही पक्षातील जागेचा तिढा सुटणार आहे. दरम्यान स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत केलेल्या मतदानावरून सुरु झालेल्या वादामुळे शहरात एमआयएममध्ये खटके उडाले आहेत. हा वाद आता पक्षाध्यक्षांच्या दरबारी गेला आहे. याच संदर्भात खासदार इम्तियाज जलील दोन दिवसापासून हैदराबादेत तळ ठाकून आहे. 

स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत एमआयएमचा उमेदवार नव्हता. पक्षाने कोणालाही पाठिंबाही जाहिर केला नव्हता. अशातच एमआयएमच्या 26 नगरसेवकांनी मतदान केले होते. या मतदानामुळे शिवसेनेला मदत झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. निवडणुकीच्या पहिल्या दिवशी शिवसेनेचे नेते एमआयएमच्या संपर्कात होते. यात काहीतरी काळेबेरे झाल्याचेही बोलले जात आहेत. यातच काही नगरसेवकांनी खुद्द खासदार इम्तियाज जलील आणि गटनेता नासेर सिद्दकी यांच्यावर नाराजी व्यक्‍त करीत एमआयएम पक्षाध्यक्ष ओवैसी यांची वेळही मागितली होती. 

याच प्रकरणासह आगामी विधानसभेच्या जागेसंबंधी बैठकीस उपस्थित राहणाऱ्यासाठी खासदार इम्तियाज जलील हैदराबादला रवाना झाले होते. हैदराबाद मधील एम आय एम चे मुख्य कार्यालय दारुस सलाम येथे शनिवारी बैठक झाली, तत्पूर्वी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत खासदार इम्तियाज अनिल आणि असदुद्दीन ओवेसी हे सोबत होते. यासह आणखी दोन दिवस ते हैदराबादेत राहणार आहे. निवडणुकीतील या प्रकाराविषयी आता थेट पक्ष कार्यालयातून काय आदेश निघणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी यांच्यात 26 ऑगस्टला होणाऱ्या बैठकीत राज्यातील 76 जागा विषयी चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. यासह औरंगाबादच्या जागेवरही या बैठकीत दोन्ही पक्षातील नेते चर्चा करणार असल्याचीही माहिती समोर येत आहेत. दरम्यान खासदार इम्तियाज जलील आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यात विधानसभेच्या रणनीती, जागावर महत्वपुर्ण चर्चा झाल्याचीही माहिती समोर येत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com