कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधींच्या साट्यालोट्याबद्दल गडकरी खरे बोलले - इम्तियाज जलील

 कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधींच्या साट्यालोट्याबद्दल गडकरी खरे बोलले - इम्तियाज जलील

औरंगाबाद : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी लोकप्रतिनिधी व कंत्राटदार यांच्याबद्दल केलेले विधान व आरोप दुर्दैवाने खरा आहे. मराठवाड्याच्या बाबतीत त्यांनी केलेले विधान वेदना देणारे असले तरीही ते सत्य आहे. प्रशासनातील अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कंत्राटदारांचे साटेलोटे आहे हे कुणीही नाकारू शकत नाही अशा शब्दात "एमआयएम' चे खासदार इमतियाज जलील यांनी गडकरींच्या विधानाचे समर्थन केले आहे. 

औरंगाबाद येथील औद्योगिक प्रदर्शनाच्या सोहळ्यात बोलताना नितीन गडकरी यांनी रखडलेल्या रस्ते कामावरून लोकप्रतिनिधींना चांगलेच सुनावले. काम सुरू होण्याआधीच कंत्राटदाराला आमदार खासदारांच्या घरी जावे लागते अन्यथा त्यांना काम करू दिले जात नाही. विकास कामात खोडा घातला जातो असे गंभीर आरोप आपल्या भाषणात त्यांनी केला होता. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना या संदर्भात विचारले असता ते म्हणाले, गडकरींचे हे विधान कटू सत्य आहे. मी या कार्यक्रमाला उपस्थित होतो, तेव्हा तुम्ही सोडून असा उल्लेख करत गडकरींनी लोकप्रतिनिधी ,कंत्राटदार यांच्या बाबतीत ते विधान केले होते. 

लोकप्रतिनिधी, कंत्राटदार आणि प्रशासनातील अधिकारी यांच्यातील संगनमताने अनेक विकासाची कामे रखडतात हा काही आजचा अनुभव नाही . यासंदर्भात मी स्वतः आमदार असताना विधानसभेत वेळोवेळी आवाज उठवलेला आहे. महानगरपालिकेच्या वतीने शहरात होत असलेल्या कोट्यवधींच्या रस्त्यांच्या कामासंदर्भात देखील त्याची गुणवत्ता आणि दर्जा तपासला जावा अशी मागणी मनपा आयुक्तांकडे पत्राद्वारे मी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील रस्त्यांच्या कामासंदर्भात काही मुद्दे उपस्थित करत या विषयाला हात घातला होता. त्यामुळे गडकरी यांनी केलेले विधान मराठवाड्याच्या दृष्टीने दुःखदायक असले तरी ते सत्य आहे हे नाकारून चालणार नाही. कंत्राटदारांचे लागेबांधे असल्यामुळेच अधिकारी निर्ढावलेत असा माझा अनुभव आहे. त्यामुळे गडकरींच्या विधानातून काहीतरी बोध घेणे आवश्‍यक असल्याचे मत देखील इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com