jalil and chavan | Sarkarnama

पृथ्वीराज चव्हाण फक्त पोस्टरवरील फोटो पुरतेच नेते - इम्तियाज जलील

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

औरंगाबाद : वर्षानुवर्षे मुस्लिम मतांच्या जोरावर राज्यात आणि केंद्रात सत्ता भोगलेल्या कॉंग्रेसला आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवू लागताच जातीयवादी वाटू लागलो का ? अशा शब्दांत "एमआयएम'चे आमदार इम्तियाज जलील यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पलटवार केला. आम्हाला जातीयवादी ठरवणाऱ्या चव्हाणांनी आधी त्यांच्या मतदारसंघातच निवडणूक जिंकून दाखवावी असे आव्हान देखील इम्तियाज यांनी दिले. 

औरंगाबादेत नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी वंचित आघाडी सोबतच्या प्रश्‍नावर बोलतांना एमआयएम सारख्या जातीयवादी पक्षाला कदापी सोबत घेणार नाही असे स्पष्ट केले होते. या संदर्भात आमदार इम्तियाज जलील यांना पत्रकारांनी छेडले असता, पृथ्वीराज चव्हाण आता फक्त पोस्टरवरील फोटो पुरतेच नेते आहेत असा टोला लगावला. गेली सत्तर वर्ष मुस्लिम मतांच्या जोरावरच केंद्रात आणि राज्यात कॉंग्रेसने दिर्घकाळ सत्ता उपभोगली. केवळ वोटबॅंक म्हणून मुस्लिमांचा वापर करून घेतला. मुस्लिमांच्या जेव्हा ही गोष्ट लक्षात आली आणि ते एमआयएमच्या नेतृत्वाखाली एकवटले तर यांच्या पोटात गोळा उठला. आम्ही स्वंतत्रपणे निवडणूका लढवायला लागलो, जिंकायला लागलो की कॉंग्रेसला जातीयवादी कसे वाटायला लागलो ? असा सवाल देखील इम्तियाज यांनी उपस्थित केला. 

पक्षातील घाण साफ करणार 
एमआयएमचे वादग्रस्त नगरसेवक सय्यद मतीन यांना पक्षाने नुकतेच पक्षातूक कायमस्वरूपी बडतर्फ केले. या संदर्भात भूमिका स्पष्ट करतांना आकड्यांकडे न पाहता पक्षातील घाण साफ करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांची यापुढेही गय केली जाणार नाही, त्यांच्यावर अशीच कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. आगामी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीतर्फे राज्यात सात ते आठ जागांवर उमेदवार दिले जाणार आहेत. उमेदवारांची नावे निश्‍चित झालेली नसली तरी त्यादृष्टीने चाचपणी आणि तयारी सुरू आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील मतदारांचा कल पाहता जिथे भाजप-कॉंग्रेसला पर्याय आहे, तिथे जनता तिसरा पर्याय स्वीकारत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहत असल्याचा दावा देखील इम्तियाज यांनी केला. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख