आधी उर्दू शिका ; मगच कळेल तुमच्या फोटो खाली चांगले लिहिले की वाईट - इम्तियाज जलील

आधी उर्दू शिका ; मगच कळेल तुमच्या फोटो खाली चांगले लिहिले की वाईट - इम्तियाज जलील

औरंगाबाद : अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालय, राज्य उर्दू साहित्य अकादमी आणि मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळातर्फे पारितोषिक वितरण समारंभ आणि उर्दू मुशायराचा कार्यक्रम औरंगाबमध्ये झाला. या कार्यक्रमात उर्दू भाषेवरून महापौर नंदकुमार घोडेले आणि इम्तियाज जलील यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाली. " मला उर्दू येत नाही, मात्र उर्दू पेपरात माझा फोटो पाहून मी खुश होतो ' असे महापौरांनी आपल्या भाषणात सांगितले. तर " महापौरांनी उर्दू शिकावी, त्यानंतर फोटोखाली चांगले लिहिलेय की वाईट हे कळेल.' असा टोला खासदार इम्तियाज जलील यांनी महापौरांना लगावला. 

अल्पसंख्याक विकास विभाग, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ आणि उर्दु साहित्य अकादमीच्या वतीने उर्दु साहित्यातील उत्कृष्ठ योगदान देणाऱ्यांना 122 जणांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना खासदार इम्तियाज जलील बोलत होते. खासदार जलील म्हणाले, मुंबईत अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम घेण्यात येतो. हा कार्यक्रम इकडे आणणे मुश्‍कील होते. मात्र राज्यमंत्री अतुल सावे यांनी ठरवले होते. कार्यक्रम होणार तो औरंगाबादलाच. सावेंनी ते करून दाखवलं असे सांगत खासदारांनी सावेंवर स्तृती सुमने उधळली. 

हे शहर उर्दूवर प्रेम करणाऱ्यांचे आहे. यामुळे हा कार्यक्रम पुढेही औरंगाबादेत घेण्यात यावा. उर्दू वाढविण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न प्रशासनीय आहे. मात्र यात आणखी काम होणे बाकी असल्याचेही ते म्हणाले. महापौर म्हणाले, मी अल्पसंख्याक आहे. मात्र मी वंचित नसल्याचा टोला इम्तियाज जलील यांना लगावला होता. खासदार जलील म्हणाले, महापालिकेत 26 उर्दू भाषिक नगरसेवक आहे. त्यांना मराठी कळत नाही. ज्याप्रमाणे मराठीत ठराव निघतात. त्याच प्रमाणे त्यांच्यासाठी उर्दू भाषेच्या ठरावाची प्रत काढावी अशी मागणी त्यांनी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com